आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 45 Isis Terrorists Killed After Eating Meal In Iftari

इफ्तारीमध्ये विषारी अन्न खाल्ल्याने ISIS च्या 45 दहशतवाद्यांचा मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
File : सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेला एक फोटो. - Divya Marathi
File : सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेला एक फोटो.
बगदाद - इराक्या मोसूल शहरामध्ये विषारी अन्न खाल्ल्यामुळे इस्लामिक स्टेटच्या 45 दहशतवाद्यांचा मृत्यू झाला आहे. सर्व दहशतवाद्यांनी रोजा सोडण्यासाठी इफ्तारीचे आयोजन केले होते. त्यात जेवण केल्यानंतर काही मिनिटांमध्येच या सर्वांचा मृत्यू झाला. जेवणात विष कसे आले याबाबत अद्याप काहीही माहिती मिळालेली नसली तरी ही सामुहिक हत्या असल्याची चर्चा आहे. मात्र, अद्याप या वृत्ताला दुजोरा मिळालेला नाही.

कुर्दीश पार्टीची प्रतिक्रिया
कुर्दीश डेमोक्रॅटिक पार्टीचे प्रवक्ते सईद ममोजेनी यांनी सांगितले की, मोसूलमध्ये इफ्तारीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात ISIS च्या 145 दहशतवाद्यांनी रोजा सोडला. पण ISIS च्या वतीने याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

यापूर्वीही जेवणात मिसळले होते विष
नोव्हेंबर 2014 मध्येही अशा प्रकारचे एक वृत्त आले होते. त्यात एका कुर्द जवानाने ISIS च्या एका कॅम्पमध्ये शेफ बनून त्यांच्या जेवणात विष मिसळले होते. त्यातही अनेक दहशतवाद्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. 10 लाख लोकसंख्या असलेल्या मोसूल शहरावर गेल्यावर्षी जूनपासून इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी ताबा घेतला आहे.