आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेत रेल्वे अपघातात 5 ठार, तर 50 जण गंभीर जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: बचाव कार्य करताना बचाव पथक.
फ‍िलाडेल्फ‍िया - अमेरिकेच्या फ‍िलाडेल्फ‍ियाजवळ मंगळवारी(ता.12) रेल्वे रुळावरुन घसरल्याने 5 लोकांचा मृत्यू झाला. तसेच 50 जण जखमी झाले आहेत. फ‍िलाडेल्फ‍िय आग्न‍िशमन विभागाने सांगितले,की मंगळवारी रात्री वॉशिंग्टनहून न्यूयॉर्ककडे जाणारी अमट्रॅक रेल्वेत 238 प्रवाशी आणि पाच क्रू सदस्य प्रवास करित होते.

रेल्वेचे सातही डबे आणि इंजिन पूर्णपणे नष्‍ट झाले आहे. अपघातात पाच लोकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त असून 50 जमखींपैकी 49 जणांना हॉस्पिटलमध्‍ये दाखल करण्‍यात आले आहे.रेल्वेचा एक डबा इंग्रजी एल आकारात वाकला असून याने अपघाताची तीव्रता कळून येते. रात्र असल्याने बचाव पथकाला प्रवाशांना बाहेर काढण्‍यास अडथळा येत होते.
पुढील स्लाइड्सवर पाहा, अमेरिकेतील रेल्वे अपघातानंतरची फोटोज...