आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेत फायरिंगमध्ये चार सैनिक ठार; हल्लेखोर कुवेतचा, ISISशी संबंध

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुटुंबासह हल्लेखोर युसूफ (ऑरेंज टी शर्टमध्ये) - Divya Marathi
कुटुंबासह हल्लेखोर युसूफ (ऑरेंज टी शर्टमध्ये)
न्यूयॉर्क - अमेरिकेच्या टेनिसीमझ्ये नेव्हीच्या बिल्डींगवर एका हल्लेखोराने अंधाधुंद गोळीबार केला. त्यात चार मरीन कमांडोचा मृत्यू झाला. सुरक्षारक्षकांनी या हल्लेखोरालाही ठार केले. हल्लेखोर 24 वर्षीय मोहम्मद यूसुफ अब्दुल अजिज असल्याची ओळख पटली आहे. त्याचा जन्म कुवेतमध्ये झाला होता. जॉर्डनमध्ये लहानाचा मोठा झाला आणि कुटुंबाबरोबर 1996 मध्ये अमेरिकेत आला होता. तो हौशी फायटर होता आणि विद्यापीठाच्या संघाकडून खेळलाही होता. काही दिवसांपूर्वी त्याला मद्यधुंदावस्थेत गाडी चालवल्याने अटक करण्यात आली होती.
युनिव्हर्सिटी ऑफ टेनिसीच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, त्याने 2012 मध्ये इंजिनिअरींगची पदवी घेतली होती. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यूसूफच्या वडिलांची अनेक वर्षांपूर्वी परदेशी दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या शक्यतेवरून विचारपूस झाली होता. शाळेत असताना त्याने इअरबूकमध्ये असे लिहिले होते की, माझे नाव देशातच्या सुरक्षेसाठी धोका निर्माण करते, तुमचे नाव काय काय करते? हल्ल्यानंतर त्याच्या घरातील दोन महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

ISIS कनेक्शनची शंका
तपास संस्था सध्या या प्रकरणाला स्थानिक दहशतवादाच्या नजरेतून पाहत आहेत. राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी ही घटना दुःखद असल्याचे म्हटले आहे. हल्ल्यामागच्या कारणाबाबत एफबीआईने मौन बाळगले आहे. हल्लेखोराचे दुसऱ्या जिहादी संघटनेशी किंवा ISIS बरोबर संबंध आहेत का याचा तपास घेण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. ISIS ने त्यांच्या समर्थकांना रमजानच्या महिन्यात 'लोन वुल्फ अटॅक' (एकट्याने केलाला हल्ला) करण्याचे अपील केले आहे.

असा झाला हल्ला
पहिला हल्ला स्थानिक वेळेनुसार सकाळी 10. 45 झाला. हल्लेखोराने यूस नेव्ही रिटायरमेंट सेंटरवर फायरिंग केले. त्यानंतर हल्लेखोर एका फोर्ड मस्टॅग कारमध्ये बसून फरार झाला. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला आणि यूएस नेव्ही रिझर्व्ह सेंटरजवळ त्याला ठार केले. दरम्यान, हल्लेखोराच्या फायरींगमध्ये नेव्ही रिझर्व्ह सेंटरमध्ये चार कमांडोंचा मृत्यू झाला. तर तीन जण जखमी झालेत.

पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित PHOTOS
बातम्या आणखी आहेत...