आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ब्रिटनमध्ये ५ महिन्यांच्या मुलीचे फुप्फुस प्रत्यारोपण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - ब्रिटनमध्ये इमोजेन बोल्टन या साडेपाच वर्षांच्या मुलीची दोन्ही फुफ्फुसे प्रत्यारोपित करण्यात आली आहेत. एवढ्या कमी वयात ही शस्त्रक्रिया होणारी ती युरोपातील पहिलीच मुलगी आहे. इमोजेनला जन्मापासूनच अॅव्हिओला कॅपिलिअरी डिस्प्लेसिया नावाचा दुर्लभ आजार होता. या आजारात जन्मानंतर काही आठवड्यांतच मृत्यूचा धोका असतो.
इमोजेनची शस्त्रक्रिया सप्टेंबरमध्ये लंडनच्या ग्रेट ऑर्मंड स्ट्रीट रुग्णालयात झाली होती. रुग्णालयात एक महिना घालवल्यानंतर तिला ब्रिटनमध्ये राहणारे पालक जेसन आणि हायले यांच्या सुपूर्द करण्यात आले. इमोजेनची आई हायलेने सांगितले, ‘आम्हाला पहिल्यांदा प्रत्यारोपणाबाबत सांगण्यात आले तेव्हा आम्ही घाबरलो होतो. त्यामुळे इमोजेन अजून खूप लहान आहे, असे म्हणत आम्ही नकार दिला होता. प्रत्यारोपणात सर्वात मोठी अडचण इमोजेनच्या वयाचा दाता मुलगा शोधण्याची होती. जेव्हा दुसरा डोनर मिळाला तेव्हा आमच्या आनंदाला पारावार उरला नाही. ग्रेट आर्मंड स्ट्रीट रुग्णालयात प्रत्यारोपण यशस्वी झाले. आता डॉक्टर इमोजेनच्या प्रकृतीबाबत निश्चिंत आहेत. इमोजेन जगातील सर्वात नशीबवान मुलगी आहे.’ दात्याची ओळख सांगण्यात आली नाही. इमोजेनचे आई-वडील जेसन आणि हायलेने दात्याचे आभार मानले.

साडेसात तास चालली शस्त्रक्रिया : शस्त्रक्रियेच्या वेळी इमोजेनचे वजन साडेचार किलो होते. तिची शस्त्रक्रिया साडेसात तास चालली. शस्त्रक्रियेत आधी इमोजेनची श्वासनलिका आणि धमन्या कापण्यात आल्या, नंतर तिला जीवरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले. नंतर तिची फुफ्फुसे काढून दात्याची फुप्फुसे लावली. तज्ज्ञ डॉक्टर हेलेन स्पेन्सर यांनी सांगितले की, शस्त्रक्रिया खूपच कठीण होती. ती यशस्वी ठरली हे दिलासादायक आहे. अशा प्रकरणांत दाता मिळणे हीच सर्वात कठीण बाब असते. अनेकदा दात्याच्या शोधातच मुलांचा मृत्यू होतो.
वर्षात २०० मुलांना होतो आजार
इमोजेनला अॅव्हिओला कॅपिलिअरी डिस्प्लेसिया नावाचा आजार होता. त्यात फुप्फुसात रक्तप्रवाह करणाऱ्या धमन्या पूर्णपणे विकसित नसतात. मुले व्यवस्थित श्वास घेऊ शकत नाहीत. रक्तात आवश्यक प्रमाणात आॅक्सिजन न मिळाल्याने जगात वर्षभरात २०० मुलांना हा आजार होतो.
बातम्या आणखी आहेत...