ब्रिटनमधील व्हर्सेस्टशायर काउंटीच्या मेलव्हेरनमध्ये बसफेस्ट व्हॅन फेस्टिव्हल झाला. यात प्रत्येक जण एकाच व्हॅनमध्ये बसण्याची धडपड करत होता. विशेष म्हणजे या ५१ जणांनी एकाच व्हॅनमध्ये बसण्याचा जागतिक विक्रम केला आहे. त्यांनी या प्रयोगासाठी १९७४ ची एक कँपरव्हॅन निवडली. "मेक ए विश फाउंडेशन'च्या सेवाभावी उपक्रमांसाठी निधी संकलन हा याचा उद्देश होता. ही संस्था गंभीर आजाराशी लढणाऱ्या लोकांच्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करते. व्हॅनमध्ये बसणाऱ्यांनी सांगितले की, एका व्हॅनमध्ये इतके लोक बसतील असे आम्हाला वाटले नव्हते. परंतु सर्वानी निर्धार केला की, काहीही झाले तरीही विक्रम करायचाच आणि शेवटी आम्ही त्यात यशस्वी झालोच.
पुढील स्लाइड्सवर पाहा संबंधित फोटोज...