आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 54 Dead As Russian Trawler Sinks In Freezing Waters Off Far East Coast

रशियाजवळ जहाज बुडून ५४ जणांना जलसमाधी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॉस्को - रशियाच्या पूर्वेकडील प्रशांत महासागरात जहाज बुडाल्याची दुर्घटना गुरुवारी उघड झाली. त्यात किमान ५४ जणांचा मृत्यू झाला. मासेमारी करणारे हे जहाज होते. त्यात किमान १३२ जण होते. बुडालेले जहाज रशियन कंपनीचे असल्याचे स्पष्ट झाले आहे.

रशियाच्या कॅमचॅटका किनारपट्टीपासून काही अंतरावर समुद्रात ही दुर्घटना घडली. सुदैवाने ६३ जणांना वाचवण्यात यश आल्याचा दावा बचाव पथकाकडून करण्यात आला आहे. १५ जण दुपारपर्यंत बेपत्ता होते. बचाव पथकाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. जहाजातील नागरिकांना वाचवण्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली आहे. त्यामधील ९ जणांचा प्रकृती गंभीर आहे. बचाव मोहीम सुरू असताना जहाजातील नऊ जणांची प्रकृती बिघडली आहे; परंतु अद्याप त्यांना रुग्णालयात पोहोचवता येऊ शकलेले नाही. बेपत्ता १५ जणांना वाचवण्यासाठी त्यांचा शोध घेण्यात येत आहे, असे रशियाच्या आपत्ती व्यवस्थापन खात्याच्या मंत्र्यांकडून स्पष्ट करण्यात आले.
दरम्यान, समुद्रातून बचावलेल्या, परंतु प्रकृती खालावलेल्या प्रवाशांना सायंकाळी उशिरा मागाडान शहरात उपचारासाठी हेलिकॉप्टरने नेण्याचे काम सुरू झाले होते.

हिपोथेरमियाचा त्रास : बोटीतील अनेक प्रवाशांना समुद्रात पडल्यामुळे हिपोथेरमियाचा त्रास जाणवू लागला आहे. समुद्राचे तापमान खूपच कमी असल्याने शरीराचेही तापमान कमी झाले आहे. त्यातून प्रवाशांचा त्रास होत आहे.
रशियाचा तपास

मासेमारी करणारी बोट बुडाल्याच्या कारण शोधण्यासाठी रशियन अधिकाऱ्यांनी तपासाला सुरुवात केली आहे. जहाजाकडून सुरक्षा नियमांचा भंग झाला असावा, असा तपास अधिकाऱ्यांचा प्राथमिक अंदाज आहे.
बचाव मोहीम

सागरी बचाव मोहिमेत अद्यापही काही नागरिकांचा शोध घेण्यात येत आहे. आतापर्यंतच्या मदतकार्यासाठी १ हजार ३०० कर्मचारी सक्रिय आहेत. त्यासोबतच जहाज आणि हेलिकॉप्टर अशा २६ साधनांचीही मदत घेण्यात आली आहे.
अनेक महिन्यांची मासेमारी

१०४ मीटर लांब आणि ५ हजार ७०० टन वजनी असलेले हे महाकाय जहाज पूर्वेकडील समुद्रात मासेमारीच्या दीर्घ मोहिमेवर निघालेले होते. त्यात अनेक परदेशी नागरिकही होते. ही मोहीम अनेक महिने चालणार होती. जहाजावर बहुराष्ट्रीय कंपन्यांचे कर्मचारी होते. १९८९ मध्ये मेगेलॉन कंपनीने या जहाजाची बांधणी केली होती. बंदराचे शहर असलेल्या नेव्हेल्स्क येथे कंपनीचे कार्यालय आहे.