आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रशियात मासेमारी करणार्‍या जहाजाला जलसमाधी, 54 ठार, 15 बेपत्ता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॉस्को- रशियातील ओखोतस्कच्या समुद्रात एका मासेमारी करणारे फ्रीजर जहाजाला जलसमाधी मिळाली आहे. या दुर्घटनेत चालक दलाचे 54 जणांचा मृत्यु झाला आहे. 63 जणांना वाचवण्यात यश आले असून 15 जण अद्याप बेपत्ता आहेत. या जहाजावर चालक दलाचे एकूण 132 लोक होते.
रशिया न्यूज एजेन्सी 'इतरतास'नुसार, ही दुर्घटना पश्चिमी प्रशांत महासागरातील कामचातका जवळ बुधवारी रात्री उशीरा घडली. हे ठिकाण रशियातील फार ईस्टमधील मैगादानपासून 250 किलोमीटर अंतरावर आहे. बचाव कार्य सुरु असून 63 जणांना वाचवण्यात यश आले आहे. अद्याप 15 जण बेपत्ता आहेत.
बचाव पथकातील एका अधिकार्‍याने सांगितले की, या जहाजावर 78 रशियन आणि म्यानमारमधील कमीत कमी 40 लोक उपस्थित होते. याशिवाय चालक दलातील यूक्रेन, लिथुआनिया आणि वानुअतुचे सदस्य होते.