आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केनिया विद्यापीठातील ५८७ विद्यार्थ्यांची सुटका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गरिसा - केनियातील विद्यापीठात गुरुवारी अल-शबाब या दहशतवादी संघटनेने केलेल्या हल्ल्यात १४७ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचे शुक्रवारी सरकारकडून स्पष्ट करण्यात आले. दुसरीकडे सुरक्षा दलाने देशाच्या विविध भागांतील येथे शिकणाऱ्या ५८७ विद्यार्थ्यांना नातेवाइकांच्या ताब्यात देण्याची कारवाई सुरू केली.
सोमालियातील दहशतवादी संघटनेने हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. १९९८ नंतरचा हा देशातील पहिलाच हल्ला आहे. नैरोबीमध्ये अल-कायदाने अमेरिकी दूतावासावर केलेल्या बॉम्बहल्ल्यात २०० जणांचा मृत्यू झाला होता. गुरुवारी चार हल्लेखोर विद्यापीठात घुसले आणि त्यांनी विद्यार्थ्यांवर बेधुंद गोळीबार केला होता. घटनेत ७९ जण जखमी झाले. सोमालियाच्या सीमेजवळच विद्यापीठ असल्याने हल्ला पूर्वनियोजित होता, हे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, ही घटना देशासाठी दु:ख आहे.

ख्रिश्चनांना लक्ष्य

केनियातील विद्यापीठात मुस्लिमेतर विद्यार्थ्यांना हल्लेखोरांना लक्ष्य केल्याचा दावा विद्यार्थी जाफेर मॅवाला याने केला आहे.

वाँटेडचे छायाचित्र जारी
केनियातील हल्ल्याशी संबंधित संशयिताचे छायाचित्र जारी करण्यात आले आहे. मोहंमद मोहंमद असे संशयिताचे नाव आहे.