आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष: ६५०० कर्मचा-यांना घडवली पॅरिसची सहल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॅरिस- टीआंशी या चीनच्या बहुराष्ट्रीय थेट विक्री करणा-या कंपनीला अलीकडेच २० वर्षे पूर्ण झाली. कंपनीचे अध्यक्ष ली जिनयुआन यांनी एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने या यशाचा आनंद साजरा केला.

टीआंशी कंपनीत १२ हजार कर्मचारी एकट्या चीनमध्येच काम करतात. जिनयुआन यांनी त्यांना बक्षीस म्हणून पॅरिसची सहल घडवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी ९५ कोटी रुपये खर्च केले आणि जवळपास साडेसहा हजार कर्मचा-यांना फ्रान्सची मोफत सहल घडवली. शॉपिंगव्यतिरिक्तचा सर्व खर्च कंपनीने केला. दोन दिवस पॅरिसमध्ये फिरल्यानंतर कर्मचारी शुक्रवारी दक्षिण फ्रान्समधील नाइस सिटीत दाखल झाले. तेथील स्थानिक लोक आणि पर्यटकांना ही माहिती मिळाल्यानंतर काहींनी ‘तुमच्या कंपनीत व्हॅकन्सी आहे का?’ अशी विचारणाही केली. विशेष म्हणजे या सहलीमुळे टीआंशी आणि ली जिनयुआन यांचे नाव गिनीज बुक ऑफ रेकाॅर्ड‌्समध्ये दाखल झाले. हा गट युरोप दौ-यावर येणारा चिनी पर्यटकांचा सर्वांत मोठा गट ठरला.

नाइस सिटीत दाखल झालेले कंपनीचे कर्मचारी
१.५० लाख रु. प्रति व्यक्ती झाला खर्च.
४७६० रूम बुक केल्या १४० हॉटेलमध्ये.
७९ चार आणि पंचतारांकित हॉटेल.
१४६ बस बुक केल्या फिरण्यासाठी.
१४३ कोटी रु.ची कमाई झाली फ्रान्सची.

जिनयुआनची कारकीर्द
ली यांनी १९९५ मध्ये टीआशी कंपनी स्थापन केली. १९९८ मध्ये कंपनीने परदेशात विस्तार केला. आज हा एक बहुराष्ट्रीय ग्रुप बनला अाहे. सध्या भारतासह १९० देशांत कंपनीचा व्यवसाय सुरू आहे. २०११ च्या ‘फाेर्ब्ज’च्या अब्जाधीशांच्या यादीतही जिनयुआन यांचा समावेश होता. त्यांची कंपनी औषध निर्माण, वित्त, शिक्षण, रिअल इस्टेट, रिटेल आणि ई-कॉमर्स क्षेत्रात काम करते.