आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कट्टरपंथियांच्या देशात अडकली होती मुस्लिम मॉडेल, मृत्यूचे गूढ कायम...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - बांग्लादेशच्या इस्लामिक बँक मेडिकल कॉलेजची विद्यार्थिनी आणि मॉडेल रॉधा आथिफ हिच्या मृत्यू प्रकरणाला नवे वळण लागले आहे. 60 मिनिटांच्या एका इनव्हेस्टिगेटिव्ह शो मध्ये तिने आत्महत्या केली नसून तिचा खून झाला होता असा दावा करण्यात आला आहे. स्थानिक अधिकाऱ्यांच्या फॉरेन्सिक अहवालांवर हा शो तयार करण्यात आला आहे. रॉधा आथिफचा मृतदेह हॉस्टेलच्या रूममध्ये पंख्याला लटकेल्या अवस्थेत सापडला होता. 
 
हा आहे टीव्ही शोचा दावा...
>> टीव्ही शो नुसार, इस्लामिक बँक वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या रॉधा आथिफवर यापूर्वीच कट्टरपंथी समुहांशी संबंध असल्याचे आरोप लागले होते. स्थानिक पोलिसांनी कॉलेजवर धाड टाकून या प्रकरणात 29 लोकांना अटक केली होती. 
>> रिपोर्टमध्ये सांगितल्याप्रमाणे, तिचा मृत्यू झाला त्यावेळी रुममध्ये स्वयंपाक शिजत होते आणि कपमध्ये चहा ठेवला होता. एवढेच नव्हे, तर रुममध्ये आरसा आणि काचेचा टेबल फुटलेला होता. 
>> पोलिसांना तिचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला होता. मात्र, तिच्या गळ्यावर आणि इतर ठिकाणी कापल्याचे घाव होते. 
>> ती पंख्याला ज्या स्कार्फने लटकली होती, त्या स्कार्फने अशा प्रकारचे घाव होणे अशक्य आहे. तिचा गळा बेल्ट किंवा इतर एखाद्या वस्तूने आवळला असल्याचे फॉरेन्सिक तज्ञांनी सुद्धा सांगितले होते. 
>> वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतल्याच्या 18 महिन्यानंतर हा प्रकार घडला. तिचे कुटुंब ऑस्ट्रेलियात होते आणि शिक्षणासोबतच मॉडेलिंग सुरू केली होती. 

हिजाब न घातल्याने ठार मारले...
मृत्यूपूर्वी तिने आपल्या एका मैत्रिणीवर विष देण्याच्या प्रयत्नाचा आरोप केला. यासोबतच तिचे सोशल मीडिया अकाउंट सुद्धा हॅक झाले होते असे तिच्या वडिलांनी म्हटले आहे. तिचे वडील मोहम्मद आथिफ यांनी आपल्या मुलीचा मृत्यू एक मर्डर असल्याचे सांगितले होते. हिजाब घालण्यास नकार दिल्याने कट्टरपंथियांनी तिला ठार मारले असे आरोपही त्यांनी लावले आहेत. 

एका फोटोने मिळवून दिली प्रसिद्धी
निळ्या डोळ्यांची रॉधा आथिफ पाण्यात उभी असतानाचा फोटो जगभरात व्हायरल झाला होता. यानंतर मॉडेलिंगची सुरुवात करणारी रॉधा ऑक्टोबर 2016 मध्ये वोग मॅगझीनच्या कव्हर पेजवर झळकली होती. 
 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...