आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्लाय दुबई विमानाला अपघात, ६२ मृत्युमुखी, रशियात दुर्घटना, २ भारतीय ठार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अपघातग्रस्‍तांचे शोकमग्‍न नातेवाईक‍. - Divya Marathi
अपघातग्रस्‍तांचे शोकमग्‍न नातेवाईक‍.
मॉस्को - रोस्तोव्ह -ऑन-डॉन- रशियाच्या उत्तरेकडील शहरात शनिवारी दुबई एअरलाइन्स विमानाला झालेल्या अपघातात ६२ प्रवाशांचा मृत्यू झाला. त्यात दोन भारतीयांचाही समावेश आहे. वादळी वाऱ्यात विमान उतरत असताना त्याला आग लागल्याने ही घटना घडली.

फ्लाय दुबई विमानाला खराब हवामान असताना रशियात उतरवण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. पहिल्या प्रयत्नात वैमानिकांना यश आले नाही. त्यासाठी दुसऱ्यांदा विमान लँड केले जात होते. परंतु वादळी वाऱ्यामुळे धावपट्टीवरून विमान भरकटले. त्यामुळे काही क्षणातच विमानाने पेट घेतला. त्यात विमानाचा जळून कोळसा झाला. विमान कंपनीने फेसबुकवरून विमान अपघाताला दुजोरा दिला. रशियन तपास अधिकाऱ्यांनी ६२ जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. मृतांमध्ये ५५ प्रवासी आणि सात कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. अंजू कठीरवेल अयिप्पन, मोहन श्याम अशी मृत भारतीयांची नावे आहेत. मृतांमध्ये सर्वाधिक संख्या रशियन प्रवाशांची आहे. रशियाच्या ४४ जणांचा मृत्यू झाला. युक्रेनचे ८, तर उझबेकिस्तानचा १ प्रवासी ठार झाला आहे. घटनेत चार मुलेही दगावली. विमान कोसळल्याने घटनास्थळी मोठी प्राणहानी झाली असती. परंतु सुरक्षा यंत्रणेने तातडीने बचाव मोहीम हाती घेत सुमारे ५०० जणांना घटनास्थळाहून सुरक्षित ठिकाणी हलवले. ६० वाहनांनाही बाजूला करण्यात आले. दरम्यान, भारतीयांच्या मृत्यूबाबतची खातरजमा करून घेण्याचे काम सुरू आहे. त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी सांगितले.

आगडोंब आणि तुकडे तुकडे
विमान उतरताना भरकटून कोसळल्यानंतर मोठा आगडोंब पाहायला मिळाला. त्यानंतर काही वेळातच विमानाचे तुकडे सर्वत्र विखुरले होते. सुमारे दीड किलोमीटर क्षेत्रात तुकडेच तुकडे दिसत होते, असे टीव्हीच्या फुटेजमध्ये दाखवण्यात आले आहे. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना अर्धा तास लागला.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, संबंधित फोटोज....
बातम्या आणखी आहेत...