आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 62 Year Old Grandpa Jumped On Railway Track To Save Granddaughter

VIDEO : नातीला वाचवण्यासाठी शीख आजोबांची थेट रेल्वेसमोर उडी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अपघात सर्वांबरोबरच होत असतात. पण काही घटना आयुष्यभर मनात घर करून राहतील अशा असतात. अशीच एक घटना काही दिनसांपूर्वी सिडनीतील एका शीख कुटुंबाबरोबर घडली. 18 महिन्यांची नात, तिची आई (सून) आणि पत्नीबरोबर सिडनीच्या Wentworthville स्थानकावर एका 62 वर्षीय आजोबांबरोबर घडलेली ही घटनाही ते कधीच विसरू शकणार नाहीत. नातीसाठी सुपरहिरो ठरलेल्या या आजोबांनी तिकिट घेताना केवळ काही सेकंदांसाठी मुलीच्या प्रॉमचा हात काढला. पण प्लॅटफॉर्मवर उतार असल्याचे त्यांच्या लक्षात आले नाही. त्यामुळे मुलीची प्रॉम सरकत काही सेकंदांमध्येच रेल्वे ट्रॅकवर आदळली. काही मिनिटांतच या ट्रॅकवर वेगाने रेल्वे जाणार होती. पण आजोबांनी नातीला वाचवण्यासाठी थेट रेल्वे ट्रॅकवर उडी घेतली. घटनेचे सीसीटिव्ही फुटेज अंगावर शहारे आणणारे आहे. पूर्ण ऑस्ट्रेलियात या 62 वर्षीय सुपरहिरोचे कौतुक सुरू आहे.

अशी होती घटना...
प्रॉम सरकून जेव्हा पटरीवर पडली तेव्हा काही सेकंदामध्येत हे 62 वर्षीय आजोबा पटरीकडे धावले. त्यांनी थेट पटरीवर उडी मारली. त्यांनी पटकन चिमुरडीला उचलले आणि सुनेकडे दिले. तसेच प्रॉमही लगेचच उचलली. पण एवढ्या वेळात रेल्वे अगदी जवळ आली होती. त्यामुळे त्यांना लगेचच वर चढता आले नाही. रेल्वे जवळ येत होती त्यामुळे त्यांनी जराही वेळ न दवडता ते पटरीवर धावू लागले, अगदी काही सेकंद शिल्लक असताना त्यांना वर चढण्यात यश आले. त्यांचा हा चपळपणा पाहणारा प्रत्येक जण आश्चर्यचकित झाला होता. या घटनेत आजोबांना काही ठिकाणी खरचटले तर दीड वर्षीय मुलीला मात्र काही गंभीर जखमा झाल्या.

या प्रकरणाची माहिती देताना स्थानिक पोलिसांनी सांगितले की, हे कुटुंब तीन दिवसांपूर्वीच सिडनीला पोहोचले होते. पोलिस इन्सपेक्टर पॉल रेनाल्ड यांनी घटनेनंतर मुलीला 'Very lucky' तर आजोबांना 'Just as lucky' असे संबोधले. मुलीला लवकरच रुग्णालयातून सुटी मिळेल असे ते म्हणाले.