आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 65 Killed In Attack On Police Training Centre In Libya, Divya Marathi

लिबिया: प्रशिक्षण केंद्रावर बॉम्बहल्ला, 65 जण ठार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
त्रिपोली- लिबियातील पोलिस प्रशिक्षण केंद्रावर गुरुवारी बॉम्बहल्ला करण्यात आला. स्फोटकांनी भरलेला ट्रक परिसरात धडकवण्यात आला. त्यात ६५ जण ठार तर ३०० जखमी झाले.

झ्लीटन शहरात हे पोलिस प्रशिक्षण केंद्र आहे. आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त असलेल्या या केंद्राला हल्लेखोरांनी लक्ष्य केले. मृतांची नेमकी संख्या जाहीर होऊ शकली नाही. ६५ जणांचा मृत्यू तर ३०० जखमी झाले. मृतांत नागरिकांचाही समावेश आहे. परंतु विरोधी गटाच्या वृत्तसंस्थेने मात्र मृतांची संख्या ५० तर १२७ जण जखमी असल्याचा दावा केला आहे. अद्याप हल्ल्याची जबाबदारी काेणत्याही गटाने घेतलेली नाही. २०११ पासून लिबियात अराजकता आहे. मुअम्मर गद्दाफी यांच्या मृत्यूनंतर आयएसचा प्रभाव वाढवला आहे.

क्षेपणास्त्र पाडले
रियाध - येमेनच्या सरहद्दीमधून डागण्यात आलेल्या क्षेपणास्त्राला सौदी अरेबियाने पाडले. गुरुवारी सकाळी क्षेपणास्त्र देशाच्या हवाई क्षेत्रात घुसले होते. त्याचवेळी सौदीच्या लष्कराने त्याचा अचूक वेध घेऊन त्याला पाडले. देशातील बंडखोर शिया गटाकडून हा हल्ल्याचा प्रयत्न असावा. दुसरीकडे सौदी आपल्या मित्र राष्ट्रांसमवेत येमेनमधील सरकारला पाठिंबा देत अंतर्गत बंडाला दडपण्यासाठी कारवाईही करत आहे.