आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नेपाळमध्ये निर्णायक कोण, भारत की चीन? 65% मतदान; जनतेचा कौल महत्त्वाचा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काठमांडू- नेपाळमध्ये रविवारी सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदान पार पडले. पहिल्या टप्प्यात ६५ टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला. हिमालयीन देशात भविष्यात भारताचा प्रभाव राहील की चीन वर्चस्व राखण्यात यशस्वी ठरेल, हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. प्रांतसभेसाठी देखील निवडणूक प्रक्रिया पार पडली.


पहिल्यांदाच नेपाळमध्ये सार्वत्रिक व प्रादेशिक निवडणूक एकाचवेळी घेण्यात आली. पहिल्यात टप्प्यात ३२ जिल्ह्यांतील ३७ मतदारसंघांचा समावेश आहे. त्यात ७०२ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. मतदानासाठी सकाळी सात वाजल्या पासूनच मतदारांनी रांगा लावण्यास सुरूवात केली. पहिल्या टप्प्यात ३० लाखांहून अधिक मतदार आपला हक्क बजावण्यास पात्र होते. उत्तर नेपाळचा या टप्प्यातील प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो.


नेपाळमध्ये सीपीएन-यूएमएल व माजी बंडखोर सीपीएन  यांनी सत्ताधारी नेपाळी काँग्रेसच्या विरोधात असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांना टक्कर देण्यासाठी नेपाळी काँग्रेसने हिंदू राष्ट्रीय प्रजातंत्र पार्टीसोबत युती केली आहे. त्यामुळे प्रचार काळात परस्परांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यात आल्या. त्याचे मुख्य केंद्र राज्यघटनेची अंमलबजावणी हेच ठरले. नेपाळला २००६ पर्यंत गृहयुद्धाला सामोरे जावे लागले होते. त्यात १६ हजारावर लोकांचा मृत्यू झाला होता. यंदा होणारी निवडणूक देशाच्या दृष्टीने ऐतिहासिक आहे. १९९९ नंतरची ही पहिलीच निवडणूक आहे.  राज्यघटना लागू  झाल्यानंतर ती वास्तवात लागू करण्यासाठी निवडणूक गरजेची आहे. त्याशिवाय त्यात मतदारांनी पहिल्यांदाच हक्क बजावला आहे. 

 

दुसरा टप्पा ७ डिसेंबरला
दुसऱ्या टप्प्यात ४५ जिल्ह्यांतील मतदारसंघांचा समावेश आहे. ही प्रक्रिया ७ डिसेंबरला राबवण्यात येईल. त्यात राजधानी काठमांडू आणि दक्षिणेकडील नेपाळ, तेराईचाही समावेश आहे.

 

१७५ खासदारांची निवड
दोन टप्प्यातील निवडणुकीतून नेपाळमध्ये १७५ खासदारांची निवड केली जाईल. प्रांतीय निवडणुकीतून ३५० लोकप्रतिनिधींची निवड होईल. दोन्ही विधीमंडळाचा कार्यकाळ पाच वर्षांचा असेल.

 

सत्तेचे विकेंद्रीकरण
नव्या प्रजासत्ताकचे नवीन अध्यक्ष निवडणुकीतून निवडले जातील. संसदेच्या वरिष्ठ सभागृहा बरोबरच प्रांतीय सभागृहाच्या निवडणुकीमुळे सत्तेचे संतुलन पाहायला मिळेल. निवडणुकीमुळे राज्यांना आपापल्या विधानसभांची रचना प्रत्यक्षात आणता येणार आहे.

 

इतर देशांसोबत मैत्री
नेपाळने अलीकडेच दक्षिण आशियातील इतर देशांसोबतची मैत्री वाढवली आहे. त्यामुळे मतदार नेमका काय कौल देतात, हे पाहावे लागेल. राज्यघटनेतील काही तरतुदींमुळे भारतवंशीय मधेशींचा रोष,सीमेवरील तणाव इत्यादीचा प्रभाव देखील पडू शकतो. देशातील दोन कम्युनिस्ट पक्षांची आघाडी करण्यासाठी चीनने हस्तक्षेप करत जोर वाढवला हाेतो.

 

बातम्या आणखी आहेत...