आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोसूलमधील ६८ हजार लोक विस्थापित

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अरबिल (इराक)- इराकी लष्कराने मोसूल या शहरात आणि त्याच्या आजूबाजूला इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांच्या विरोधात लढाई सुरू केल्यानंतर ६८ हजारपेक्षा जास्त नागरिकांनी आपले घर सोडून पळ काढला आहे, असे माहिती संयुक्त राष्ट्रांतर्फे मंगळवारी देण्यात आली.
संयुक्त राष्ट्रांच्या मानवतावादी मदत कार्यालयाने म्हटले आहे की, सध्या ६८ हजार ५५० नागरिक विस्थापित आहेत. त्यांना मदतीची गरज आहे. इराकी फौजांनी मोसलूच्या अगदी आतील भागात कारवाई सुरू केल्याने गेल्या आठवड्यात विस्थापितांच्या संख्येत वाढ झाली आहे. मोसूलमध्ये अजूनही १० लाखांपेक्षा जास्त नागरिक आहेत, असा अंदाज आहे.
मोसूलमधील लढाई ही अलीकडच्या काळातील इराकी लष्कराची ही सर्वात मोठी कारवाई आहे. इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांच्या विरोधात लढाई सुरू झाल्यानंतर पहिल्या काही आठवड्यांतच दोन लाखांपेक्षा जास्त नागरिक घर सोडून पळ काढतील, असा संयुक्त राष्ट्रांचा अंदाज होता.
बातम्या आणखी आहेत...