आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 7 ELEVEN STORE OWNER IN CHINO HILLS RECEIVES $1 MILLION CHECK

जॅकपॉट तिकिट विक्री करणाऱ्या भारतीयाची लागली \'लॉटरी\', मिळाले 6 कोटी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सहा कोटी रुपयांच्या बोनसच्या चेकसह बलबीर. - Divya Marathi
सहा कोटी रुपयांच्या बोनसच्या चेकसह बलबीर.
वॉशिंग्टन - अमेरिकेत 3300 कोटी रुपयांचे जॅकपॉट तिकिट विक्री करणाऱ्या भारतीय वंशाच्या बलबीर अटवाल यांचीही लॉटरी लागली आहे. त्यांना या बक्षीसाच्या बोनसपोटी 6 कोटी रुपये मिळाले आहे. यंदा पॉवरबॉल जॅकपॉटच्या माध्यमातून 10 हजार कोटी रुपयांची रेकॉर्डब्रेक कमाई झाली आहे. यात फक्त तीनच विजेते होते. म्हणजेच प्रत्येक तिकीटाची किंमत 3300 कोटी रुपये होती. पहिले तिकिटाची विक्री अटवाल यांच्या केंद्रावरुन झाली होती.

अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठा जॅकपॉट
- अमेरिकेच्या 44 राज्यांमध्ये पॉवरबॉल जॅकपॉटसाठी तिकिट विक्री झाली.
- यंदा तिकिट विक्रीतून रेकॉर्डब्रेक जवळपास 1.58 बिलियन डॉलर म्हणजे 10 हजार कोटी रुपये कमाई झाली.
- या जॅकपॉटमध्ये फक्त तीन तिकीटांवर बक्षिस ठेवण्यात आले होते.
- अमेरिकेच्या इतिहासातील हा सर्वात मोठा जॅकपॉट समजला जात आहे.
- विजेत्या तिकिटांची विक्री कॅलिफोर्निया, फ्लोरिडा आणि टेनेसी येथून झाली.
- विजेत्यांची नावे अजून गुप्त ठेवण्यात आली आहेत.

कोण आहे बलबीर अटवाल
- बलबीर 1981 मध्ये कामाच्या शोधात भारतातून अमेरिकेत गेले होते.
- सुरुवातीला त्यांनी इलेक्ट्रिकल कंपनीत सेल्ममॅनचे काम केले. मात्र त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याची इच्छा होती.
- सुरुवातीला त्यांनी 7 इलेव्हन कन्व्हिनिएंस स्टोअरची फ्रेंचायझी घेतली. आता ते अशा चार स्टोअरचे मालक आहेत.
- बलबीर यांनी कॅलिफोर्नियाच्या चायनो हिल येथील स्टोअरमधून पॉवरबॉल जॅकपॉटच्या विनिंग तिकिटची विक्री केली होती.
- या विनिंग तिकिटाचा बोनस म्हमून बलबीर यांना एक मिलियन डॉलर (सहा कोटी रुपये) मिळाले आहेत.
- ही रक्कम ते कर्मचारी, मित्र, कुटुंब आणि चॅरिटीसाठी देणार आहेत.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, PHOTOS...