आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेच्या युद्धनौकेला औद्योगिक जहाजाची धडक; 7 जण बेपत्ता, US कमांडरसह 3 जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या अपघातात USS Fitzgerald ला खूप नुकसान झाले आहे. - Divya Marathi
या अपघातात USS Fitzgerald ला खूप नुकसान झाले आहे.
टोक्यो / वॉशिंग्टन - जपानी सागरात अमेरिकन युद्धनौका (USS Fitzgerald) आणि फिलिपाईन्सच्या औद्योगिक जहाजात जोरदार धडक झाली आहे. या भीषण अपघातात अमेरिकन नौदलाचे 7 जण सागरात फेकल्या गेले असून ते बेपत्ता आहेत. तर, जहाजातील कमांडरसह 3 जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी हेलिकॉप्टरने इतरत्र हलवण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच जपानी तटरक्षक दलांनी तातडीने घटनास्थळी पोहचून मदतकार्य सुरू केले आहे. 
 
बेपत्ता झालेल्यांच्या मृत्यूची भिती...
अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, जपानच्या सागरी किनारपट्टीजवळ यूएसएस फित्झगेराल्ड उभी असताना समोरून फिलिपाईन्सच्या व्यापारी जहाजाने शार्प यू टर्न घेतला. त्यामुळे, दोन्ही जहाजांना मोठा नुकसान झाले. या अपघातात जखमी झालेल्यांमध्ये अमेरिकन युद्धनौकेचे कमांडर ब्राईस बेनसन यांचाही समावेश आहे. तर, बेपत्ता झालेल्यांचा शोध सुरू आहे.
 
व्यस्त मार्गावर घडला अपघात
जपानच्या स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, टोक्योच्या दिशेने जाणारे जहाज आणि टोक्योहून दुसरीकडे जाणाऱ्या जहाजांसाठी एकच मार्ग आहे. अतिशय व्यस्त असलेल्या या सागरी मार्गावरच या दोन जहाजांचा अपघात झाला आहे. यासोबतच फिलिपाईन्सच्या जहाजावर तब्बल 30 हजार टन माल लादले होते. त्यामुळे, अचानक वळण घेणे महागात पडले. या घटनेचा सविस्तर तपास आणि बेपत्ता झालेल्या नौदल अधिकाऱ्यांचा शोध घेतला जात आहे. 
बातम्या आणखी आहेत...