आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फुटबाॅल स्पर्धा : ९६० कोटींचा भ्रष्टाचार उघड, फिफाच्या सात अधिकाऱ्यांना अटक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
झुरिच - फुटबॉल सामन्यात ९६० कोटी रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणात आंतरराष्ट्रीय फुटबॉल संघटनेच्या (फिफा) सात अधिकाऱ्यांना बुधवारी अटक करण्यात आली. अमेरिकन कायदा विभागाच्या निर्देशानुसार ही अटक करण्यात आली असून यात फिफाच्या उपाध्यक्षांचाही समावेश आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या प्रकरणात आणखी काही अधिकारी जाळ्यात अडकू शकतात.

स्वित्झर्लंडच्या कायदा मंत्रालयाच्या माहितीनुसार झुरिचमध्ये फिफा मुख्यालयावरही छापा मारण्यात आला असून तेथून इलेक्ट्रॉनिक डाटा व काही कागदपत्रे जप्त करण्यात आली आहे. त्यानुसार संघटनेचे काही अधिकारी अमेरिकेत फुटबॉल स्पर्धेच्या आयोजन व मार्केटिंगमध्ये आर्थिक घोटाळे करत असत. अमेरिकेने याबाबत केलेल्या स्वतंत्र तपासात हे अधिकारी गेल्या २४ वर्षांत मनी लाँडरिंग व फसवणुकीच्या प्रकरणांत दोषी आढळले आहेत. शुक्रवारी फिफाच्या नव्या अध्यक्षांची िनवड झाल्यानंतर ही सर्व प्रकरणे उजेडात आली आहेत. "न्यूयॉर्क टाइम्स'नुसार "हा भ्रष्टाचार नियोजनबद्ध पद्धतीने व संघटित स्वरूपात होत होता. फिफामध्ये त्याची पाळेमुळे खोलवर गेली आहेत. काही अधिकाऱ्यांनी या भ्रष्टाचाराला व्यवसाय बनवले होते.'

फिफाकडून कारवाईचे स्वागत
फिफाचे प्रवक्ते वॉल्टर डी जॉर्जिया यांनी सांगितले, हे प्रकरण ज्या वेळी उघडकीस आले ती वेळ निश्चितच योग्य नव्हती. परंतु फिफा या प्रक्रियेेचे स्वागत करते. त्यांनी चौकशीसाठी धन्यवादही दिले. परंतु कारवाईवर कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. स्वित्झर्लंडनेही २०२२ च्या कतार व २०१८ च्या रूस विश्वचषक स्पर्धेच्या आयोजनातील घोटाळे शोधण्यासाठी स्वतंत्र गुन्हे चौकशी सुरू केली आहे.
बातम्या आणखी आहेत...