आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 7 Times Dawood Ibrahim Escaped From Hands Of India

कराचीत दाऊदवर रोखली होती बंदूक, पण ऐनवेळी सरकारची माघार, वाचा REPORT

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मधल्या काळात अनेक दिवस काहीही चर्चा नसलेला दाऊद इब्राहीमचा मुद्दा 2014 साली लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा वर आला. तेव्हा पासून या मुद्यावर एकसारखी चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच भारताने पाकिस्तानला दिलेल्या डॉजीयरमध्ये दाऊदच्या कराचीतील घरांच्या पत्त्यांची माहिती दिली होती. तसेच दाऊदचा एक ताजा फोटोही नुकताच समोर आला आहे.

भास्करच्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष पाकिस्तानात जाऊन पत्त्यांची शहानिशा केली. तेव्हा दाऊदचे कराचीतील काही पत्ते खरे असल्याचे समोर आले. असेच अनेक पुरावे वारंवार दाऊद पाकिस्तानातच असल्याचे स्पष्ट करत आहेत. पण एवढे असूनही भारताला सुमारे 2३ वर्षांनंतरही भारताला अद्याप दाऊदला पकडणे जमलेले नाही.

दाऊदला पकडण्यात येणाऱ्या अपयशांमागे कारणे काय? असा प्रश्न नेहमीच बहुतांश भारतीयांसमोर उभा ठाकलेला असणार यात शंका नाही. पण दोन दिवसांपूर्वीच भास्करच्या प्रतिनिधीने न्यूयॉर्कमध्ये राहणारे पाकिस्तानी लेखक जमाल आरीफ यांची मुलाखत घेतली. त्यात आरीफ यांनी काही खळबळजनक पुरावे केले. दाऊदच्या दोन भेटींच्या आधारे त्यांनी हे खुलासे केले आहेत. पण त्यातून बरेच संकेत मिळतात. दाऊदला भारतातील काही बड्या हस्ती (उदा. नेते, उद्योगपती, क्रिकेटर्स) मदत करतात असा दावा त्यांनी केला आहे. मग दाऊद आतापर्यंत सुरक्षासंस्थाच्या तावडीत न सापडण्यामागे हेच कारण तर नसावे असा प्रश्नही उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही. भारताने दाऊदला पकडण्यासाठी अनेक मोहीमा आखल्या. पण अनेकदा ऐनवळी अचानक त्या रद्द करण्यात आल्या. त्यामागचे गूढही संशयाचे वातावरण तयार करणारे आहे. एका मोहिमेत तर भारतातील एजंट्सनी दाऊदला मारण्याची पूर्ण तयारी केली होती. कराचीत भारतीय एजंट्सच्या निशाण्यावर दाऊद होता. पण ऐनवेळी भारत सरकारने मोहीम थांबवली.

भारत नेहमीच दहशतवाद्यांचे लक्ष ठरला आहे. दहशतवाद्यांना पाकिस्तानकडून मदत मिळत असल्याचेही अनेकवेळा समोर आले आहे. दाऊदही अनेक भारतविरोधी कारवायांमध्ये सक्रिय असतो हे पुरावेही वारंवार मिळाले आहे. नव्या सरकारने दहशतवादाबाबत अगदी कडक भूमिका असल्याचे स्पष्ट केले आहे. सरकारने दाऊद विरोधात अनेक पुरावेही जमवले आहेत. त्यामुळे दाऊदला पकडण्यात यश येणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. पण यापूर्वीही अनेकदा दाऊद भारताच्या तावडीत आला होता. पण तो वारंवार सुरक्षा संस्थांच्या कचाट्यातून सुटण्यात यशस्वी ठरला आहे. अशाच काही घटना आपण आज जाणून घेणार आहोत.

सात वेळा भारताच्या तावडीतून निसटला आहे Dawood, कधी ते वाचा पुढील स्लाइड्सवर...