आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेत 73 हजार लोक बोलतात मराठीत, भारतीय भाषांत हिंदी आघाडीवर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - अमेरिकेत बोलल्या जाणाऱ्या भारतीय भाषांमध्ये सर्वाधिक हिंदी भाषेचा वापर केला जातो. ६.५ लाख भारतीय हिंदीत संभाषण करतात. संवाद-भाषा सर्व्हेत ही आकडेवारी समोर आली आहे. अमेरिकन सांख्यिकी विभागाने वर्ष २००९ ते २०१३ दरम्यान ही पाहणी केली. अमेरिकेतील ६० दशलक्ष नागरिक इंग्रजीऐवजी इतर भाषा घरात बोलत असल्याचे यात दिसून आले. २५ दशलक्ष नागरिक घरात इंग्रजीचाच वापर करतात.

भारतीय भाषांची आकडेवारी
भारतीय भाषांमध्ये सर्वाधिक म्हणजे ६.५ लाख हिंदी भाषा बोलतात. ४ लाख लोक उर्दू बोलतात. गुजराती बोलणाऱ्यांची संख्या ३.७ लाख असून २.५ लाख तेलगू भाषिक आहेत. तामिळ भाषेचा वापर १ लाख ९० हजार लोक करतात. मल्याळम भाषिकांची संख्या १ लाख ४६ हजार आहे. बंगाली व पंजाबी भाषिकांची संख्या २.५ लाख आहे. ७३,००० लोक मराठीत बोलतात. ४८ हजार कन्नड भाषिक आहेत. सिंधीचा वापर ९ हजार जण करतात. उडिया भाषिक ५ हजार असून १३०० अासामी बोलतात. काश्मिरी भाषिकांची संख्या १७०० आहे. राजस्थानी बोलणारे ७०० असून बिहारीचा वापर ६०० लोक करतात. आदिवासी भाषा मुंडाही येथे २००० जण बोलतात. नेपाळी भाषिकांची संख्या ९४ हजार असून तिबेटियन बोलणारे १६ हजार लोक आहेत.
सर्वंकष माहिती संकलन प्रथमच, केवळ इंग्रजी बोलणारे मोजकेच
अमेरिकन सांख्यिकी संस्थेने प्रथमच इतकी सूक्ष्म भाषिक पाहणी केली आहे. डच, युक्रेनी, तुर्की, रुमानियन, अम्हारिक, १५० स्थानिक उत्तर अमेरिकन बोली भाषांचाही वापर होतो. केवळ इंग्रजीच बोलणारे मूठभर लोक असल्याचा निष्कर्ष यात समोर आला. न्यूयॉर्कमध्येही एक तृतीयांश जनता इंग्रजीशिवाय भाषेचा वापर करते. धोरण निर्धारण, संशोधक व नियोजनतज्ज्ञांसाठी ही माहिती संकलित करण्यात आली.
अमेरिकेत बोलल्या जाणाऱ्या भाषा
स्पॅनिश - ३७.६ दशलक्षांपेक्षा अधिक लोक
चिनी - २.९ दशलक्ष
टागालॉग- १.६ दशलक्ष
फ्रेंच - १.३ दशलक्ष
कोरियन - १.१ दशलक्ष
जर्मन - १.१ दशलक्ष
व्हिएतनामी- १.४ दशलक्ष
अरेबिक - ९ लाख २४ हजार ५७३
रशियन - ८ लाख ७९ हजार ४३४
बातम्या आणखी आहेत...