वॉशिंग्टन - तब्बल ७४ टक्के भारतीय स्मार्टफोन हातात घेऊनच झोपी जातात, तर ४४ टक्के भारतीय वॉशरूममध्येही स्मार्टफोन वापरतात. लोकांच्या मोबाइल सवयी जाणून घेण्यासाठी जगातील ७ देशांमधील ७००० हून अधिक नागरिकांच्या सर्वेक्षणात ही धक्कादायक बाब समोर आली.
सर्वेक्षण केलेल्यांपैकी ६० टक्के मोबाइल वापरकर्त्यांनी मोबाइल हातात घेऊनच झोपी
जात असल्याचे मान्य केले आहे. भारतामध्ये हे प्रमाण सर्वाधिक ७४ टक्के असून त्याखालोखाल चीनचा (७० टक्के) क्रमांक लागतो. केआरसी रिसर्चने हे सर्वेक्षण केले आहे.
ओव्हर स्मार्ट
किती भारतीय कुठे वापरतात स्मार्टफोन?
२२% स्नान करता करताही
४१% शौचालयात वापर
फोनसाठी याचा त्याग
१५% अतिमहत्त्वाचे काम
१८% स्नान
१९% झोप
३५% भारतीयांनी स्मार्टफोनसाठी आठवडाभरासाठी जीवनसाथीबरोबर सह जीवनही सोडायची तयारी दर्शवली आहे.
६१% भारतीयांना घनिष्ठ मित्रापेक्षाही स्मार्टफोनकडून जास्त अपेक्षा आहेत.
आगीतून आधी स्मार्टफोन वाचवू!
आग लागली तर सर्वात आधी कोणाला वाचवाल? असा प्रश्न या स्मार्टफोनधारक वापरकर्त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर आलेले उत्तर भलतेच धक्कादायक आहे. तब्बल ६८ टक्के भारतीयांना आग लागली तर आम्ही सर्वात आधी आमचा स्मार्टफोन वाचवू, असे उत्तर देत तज्ज्ञांना निरुत्तर केले.