आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सर्वाधिक ओरिगामी हत्ती निर्मितीचा विक्रम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - जगातील विविध भागांतून आलेल्या आेरिगामी कलाकारांनी जगातील सर्वाधिक कागदी हत्तींची निर्मिती केली आहे. ७८,५६४ बहुरंगी हत्तींची निर्मिती करण्याच्या या उपक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली. वन्यजीव संरक्षक सोसायटीने यासाठी पुढाकार घेतला होता. ब्राँक्स झू येथे ३५,००० कागदी हत्तींना प्रदर्शित करण्यात आले. दरवर्षी ३५ हजार हत्तींची शिकार केली जाते. तितकेच ओरिगामीने निर्मित हत्ती येथे ठेवण्यात आले. ब्राँक्स झूला एकूण ७८,५६४ हत्ती पाठवण्यात आले. अमेरिकेच्या ५० राज्यांमध्ये यांची निर्मिती करण्यात आली होती. जगातील ४० देशांच्या आेरिगामी कलाकारांनी यात भाग घेतला.

हस्तिदंताच्या विक्रीसाठी दररोज ९६ हत्तींची कत्तल करण्यात येते. ‘९६ एलिफंट कॅम्पेन’ नावाने हत्ती बचाव अभियान वाइल्डलाइफ कन्झर्व्हेशन सोसायटीने (डब्ल्यूसीएस) हाती घेतले होते. विविध आकारांचे व रंगांचे कागदी हत्ती या प्रदर्शनात ठेवण्यात आले होते.
सर्व वयोगटांच्या लोकांनी या उपक्रमात भाग घेतला होता. १०९ वर्षांची वृद्धा यात सर्वाधिक वयाची सदस्य ठरली. इराण, कझाकिस्तान, इजिप्त येथूनही अनेक सदस्य या उपक्रमात सहभागी झाले होते.

हत्तींच्या शिकारीचे गांभीर्य जगासमोर मांडले
‘९६ एलिफंट कॅम्पेन’ने सर्वाधिक आेरिगामी हत्तींच्या निर्मिती व प्रदर्शनाचा विक्रम स्थापित करून हत्ती शिकारीचे गांभीर्य जगासमोर मांडले आहे. ३५ हजार कागदी हत्ती एकाच ठिकाणी प्रदर्शित करण्यात आले होते. या प्रदर्शनाला अधिक प्रभावी करण्यासाठी ब्राँक्स झूचे सहकार्य महत्त्वाचे असल्याचे मत डब्ल्यूसीएसचे कार्यकारी अध्यक्ष जॉन कालव्हिले यांनी व्यक्त केले. यातून समस्येचे गांभीर्य अधोरेखित करण्यात डब्ल्यूसीएसला यश आल्याचे जॉन यांनी सांगितले. यापूर्वी ब्रिटनमधील व्हिपस्नॅड झूने ३३,७६४ आेरिगामी हत्ती प्रदर्शित केले होते. हा २०१४ मधील विक्रम आता मोडण्यात आला.
बातम्या आणखी आहेत...