आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात आठ अफगाण पोलिस ठार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कंदहार - अमेरिकेने नाटोंतर्गत मोहिमेत केलेल्या हवाई हल्ल्यातील फ्रेंडली फायर कार्यक्रमातील दुर्घटनेत ८ अफगाण पोलिसांचा मृत्यू झाल्याची माहिती आज अधिकृत सूत्रांनी दिली. दहशतवादी, घुसखोरांच्या बीमोडासाठी ही मोहीम होती. त्यावेळी अपघाताने हे घडले. अमेरिकन फौजेने अशा प्रकरणात हवाई दलाला घुसखोरांच्या बीमोडासाठी हवाई हल्ल्याचा अधिकार दिलेला आहे.

ही घटना उरुझगान प्रांतातील टाली भागात काल घडली. याच भागात तालिबानींच्या हालचाली असतात. अशातच त्यांनी या प्रांताची राजधानी तारीन कोट ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता. अमेरिकनांनी तालिबानी वा घुसखोरांच्या बीमोडासाठी केलेल्या पहिल्या हवाई हल्ल्यात एका पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. त्याच्या मदतीस आलेल्या पोलिसाचाही दुसऱ्या हवाई हल्ल्यात मृत्यू झाला. इतर सात जणांचाही मृत्यू झाला, अशी माहिती उरुझगान महामार्ग पोलिस कमांडर रहिमुल्लाह खान यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.हल्ल्यात वाचलेला मोहम्मद सेदिक या पोलिसाने सांगितले की, आमची तुकडी तालिबान्यांशी अगदी निकराने लढत असतानाच हा हवाई हल्ला झाला.
बातम्या आणखी आहेत...