आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इजिप्तमध्ये लष्कराने ८ अतिरेक्यांना मारले, १२ दहशतवाद्यांनाही पकडले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कैरो - उत्तर इजिप्तमधील सिनाई प्रातांत ८ कुख्यात दहशतवाद्यांचा खात्मा करीत इजिप्शियन लष्कराने १२ खतरनाक दहशतवाद्यांना जिवंत पकडले असून यात धोकादायक दहशतवादी संघटनेची ब्रदर संघटना असलेल्या अतिरेकी संघटनेतील नेत्यांचाही समावेश आहे, अशी माहीती लष्कराच्या प्रवक्त्याने दिली.

लष्कराचे प्रवक्ते ब्रिगेडीयर जनरल मोहोंमद समीर म्हणाले की, इतर चौघे लोक ज्यांना अतिरेक्यांना सहकार्य मदत केला त्यांना देखील पकडण्यात आले आहे. चे सर्वजण अत्यंत धोकादायक मानल्या गेलेल्या टाकफिरी दहशतवादी संघटनेचे नेत्याचाही यात समावेश आहे. मात्र त्याचे नाव सांगण्यास प्रवक्ते समीर यांनी नकार दिला. त्यामुळे हे मोठे यश मानले जात आहे. इतर ८ संशयितांनाही लष्कराने छापासत्रादरम्यान अटक केली आहे.

यासाठी उत्तर सिनाई प्रांतात अनेक ठीकाणी लष्कराने छापे टाकले होते. कारण या भागातून पोलीस आणि लष्कराला लक्ष्य करत अनेक हल्ले झालेत व होत असतात. इजिप्तचे माजी राष्ट्राध्यक्ष होस्नी मुबारक हे सुध्दा अशा अनेक हल्ल्याचे साक्षीदार राहीलेले आहेत. हे हल्ले २०१३ पासून वाढले आहेत.
बातम्या आणखी आहेत...