आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुर्कीत ८ युरोपवंशीय अतिरेक्यांना अटक, इसिसचे सदस्य असल्याचा दावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्तंबूल- तुर्किश पोलिसांनी केलेल्या कारवाईत ८ संशयितांना अटक करण्यात आली. हे निर्वासित म्हणून तुर्कीत निवासास होते. हे युरोपवंशीय इसिसचे सदस्य असल्याचा दावा तुर्कीच्या संरक्षण विभागाने केला आहे. इस्तंबूलच्या अतातुर्क विमानतळावरून त्यांना दहशतवादविरोधी पथकाने ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या एका सदस्याकडे इस्तंबूल ते जर्मनी (ग्रीसमार्गे)मार्गाचे तपशील लिखित स्वरूपात मिळाले. शिवाय तस्करी बोटींच्या नोंदीही त्यात होत्या. सर्बिया, हंगेरी, भूमध्य समुद्री मार्गांची सर्व माहिती त्यांच्याकडे आढळली. शिवाय स्थानिक ट्रेन, बस प्रवासांची माहितीही सविस्तररीत्या त्यांच्याकडे मिळाली.

दरम्यान, आपण पर्यटक असल्याचे त्यांनी चौकशीदरम्यान सांगितले. आपण पूर्वीच हॉटेल बुकिंग केल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, तपासानंतर त्यांच्या नावे कोणतेही बुकिंग आढळून आले नाही. युरोपातून स्थलांतरित होणाऱ्यांसाठी तुर्की हे मोक्याचे स्थानक आहे. येथे सध्या २ दशलक्ष सिरियन निर्वासित आहेत. पाश्चात्त्य देशांनी तुर्कीवर अनेकदा टीका केली आहे. इसिसमध्ये सहभागी होण्यासाठी येणाऱ्या अनेक परदेशस्थांना रोखण्यास तुर्की ठोस पावले उचलत नसल्याचा आरोप पाश्चात्त्य देशांचा आहे. वर्ष २०१५ च्या पहिल्या सहामाहीत ७०० परदेशी इसिस समर्थक तुर्कीमार्गे सिरियात दाखल झाले.