आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

8 वर्षीय ब्रिटिश मुलाने पॉकेटमनीच्या पैशातून सुरू केला अंडे विक्रीचा व्यवसाय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टेमवर्थ (ब्रिटन)- ब्रिटनच्या टेमवर्थमध्ये राहणारा ८ वर्षीय मुलगा जेम्स याट सध्या चर्चेत आहे. याचे कारणही अजब आहे. त्याच्या बिझनेसच्या नावीन्यपूर्ण कल्पनेमुळे तो चर्चेत आहे. वार्षिक ११ लाख रुपये कमाई करण्याचे त्याचे उद्दिष्ट असून जेम्सने आपल्या आईसोबत अंडे विक्रीचे काम सुरू केले. या सेवेचे नाव ‘मिस्टर फ्री रेंज एग्ज डिलिव्हरी सर्व्हिस’ असे ठेवले आहे. याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.  

टीव्ही शोमध्ये त्याने एका उद्योजकाची यशकथा पाहिली. त्यापासून प्रेरणा घेऊन त्याने स्वत:चा व्यवसाय सुरू केला. कोणाच्याही आर्थिक मदतीशिवाय, मार्गदर्शन नसताना  जेम्सने आपल्या व्यवसायाची वाढ केली. नंतर जेम्सच्या आईने त्याची मदत केली. आता हे मायलेक जाऊन शेतकऱ्यांकडून ठोक अंडी खरेदी करतात. त्यांना पॅक करून त्याची विक्री करतात. त्यांचा व्यापार चांगला सुरू आहे. जेम्सला आईची साथ नंतर मिळाली. पहिली खरेदी त्याने आपल्या पॉकेटमनीच्या रकमेतून केली. ८५० रुपयांपासून व्यवसाय सुरू झाला. या वेळी ते २१ हजार रुपयांची खरेदी करत आहेत. मागणी वाढत आहे.  

इतर व्यावसायिकांच्या मते हा मुलगा वर्षभरात १०-११ लाख रुपये सहज कमावेल. त्याचा व्यवसाय विस्तारत आहे.  जेम्सने आपल्या कंपनीचे फेसबुक पेजही तयार केले आहे. हे पेज  त्याची आई जियोर्जिनाच्या नावे आहे. ते सोशल मीडियावरदेखील प्रचारात कोणतीही त्रुटी राहू देत नाहीत. स्थानिक माध्यमांनीही त्यांची तारीफ केली आहे. एका वृत्तपत्राने लिहिले आहे की, ‘ आजच्या युगात आपण उदयोन्मुख व्यावसायिकांच्या अनेक कहाण्या एेकल्या असतील. छोट्याशा गुंतवणुकीत सुरू झालेले व्यापार अल्पावधीत लाखो, करोडांेची उलाढाल करत आहेत. याचेच उदाहरण म्हणजे जेम्स याट.’

सध्या ३५ कायमस्वरूपी ग्राहक, दर आठवड्यात वाढ  
पॉकेटमनीमध्ये ८५० रुपयांची बचत झाली होती. गेल्या महिन्यात जेम्सने काम सुरू केले. चॅनल फोरवर प्रसारित होणारा शो ‘हाऊ वुड यू गेट सो रिच’ पाहत असताना त्याला कल्पना सुचली. गेल्या आठवड्यात त्याने ७५० अंडी विकून २१ हजार रुपये कमाई केली. सध्या त्याच्याकडे कायमस्वरूपी ३५  ग्राहक आहेत. दर आठवड्यात नवे  ग्राहक मिळत आहेत. जेम्सचे म्हणणे आहे की, त्याला या कामात मजा येत आहे. नवी माणसे भेटत आहेत. नवे अनुभव मिळत असल्याचे त्याने सांगितले. नुकतीच मिळालेली रक्कम त्याने फुटबॉल किट खरेदी करण्यात खर्च केली. बचत सुरू केली आहे. आपल्याला श्रीमंत व्हायचे असल्याचे त्याने सांगितले. आपल्याला मदत करणाऱ्यांविषयी त्याने कृतज्ञता व्यक्त केली. पालक आणि छोट्या बहिणीचे त्याने आभार मानले. 
बातम्या आणखी आहेत...