आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठवर्षीय मुलीची दरमहा कमाई ८० लाख, यू-ट्यूबवर चालवते फूड चॅनल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्वीन्सलँड - यू-ट्यूबचे स्टार लोकप्रियता आणि कमाईच्या बाबतीत हॉलीवूड-बॉलीवूडच्या मान्यवरांची बरोबरी करत आहेत. अशीच एक स्टार शेफ आहे आठवर्षीय चार्ली. ती यू-ट्यूबवर फूड चॅनल चालवते. या चॅनलद्वारे तिची दरमहा कमाई आहे ८० लाख रुपये (१.२७ लाख डॉलर). लाखो लोक नव्या रेसिपीसाठी चार्लीचा व्हिडिओ सबस्क्राइब करतात. जाणून घेऊया या छोट्याशा सेलिब्रिटी शेफची कहाणी...
सेलिब्रिटी शेफपेक्षा चार्लीच्या व्हिडिओंना जास्त प्रेक्षक
ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलँडमध्ये राहणाऱ्या चार्लीचे संपू्ण नाव आहे मिनी मार्था स्टीवर्ट. चार्लीला केक, पेस्ट्री आणि कँडी बनवण्याचा छंद आहे. तीन वर्षांपूर्वी पालकांच्या मदतीने तिने यू-ट्यूबवर अकाउंट उघडले. त्याला नाव दिले चार्लीज क्राफ्टी किचन. ते आता यू-ट्यूबची प्रतिमा म्हणून स्थापित झाले आहे. चार्लीची छोटी बहीण अॅश्ले पाच वर्षांची असून ती चॅनलची ‘चीफ टेस्टर’ आहे. चार्लीने बनवलेल्या डिशचा स्वाद घेणे आणि त्यावर आपले मत नोंदवणे हे तिचे काम. ‘आउटरिगर मीडिया’ ही ऑनलाइन व्हिडिओ अॅडव्हर्टाइज कंपनी आणि ‘अॅड एज’च्या टॉप फूड चॅनल्सच्या यादीत चार्लीचे चॅनेल पहिल्या क्रमांकावर आहे. या दोघींचे हे यू-ट्यूब चॅनल आतापर्यंत जवळपास ३ कोटी वेळा पाहिले गेले आहे. साडेतीन लाख लोकांनी ते सबस्क्राइब केले आहे. एवढ्या हिट्स मिळाल्याने चार्लीच्या चॅनलला खूप जाहिरातीही मिळतात. त्याद्वारेच चार्ली आणि अॅश्ले यांची कमाई होते. विशेष म्हणजे जगप्रसिद्ध सेलिब्रिटी शेफमध्ये गणना होत असलेले जेमी ऑलिव्हर या यादीत सर्वांत तळाशी आहेत. त्यांचे ‘फूडट्यूब’ हे चॅनल ६९ लाख लोकांनी पाहिले असून जेमी यांनी त्यातून फक्त २० लाख रुपये कमावले आहेत.