आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिरियातील राक्कामध्ये ८० दहशतवाद्यांचा खात्मा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बेरुत - दहशतवादी संघटना इसिसला शनिवारी सिरियात झटका बसला. राजधानी राक्काच्या मुख्य चौकावर सिरियाच्या सैन्याने ताबा घेतला आहे. दुसऱ्या मोठ्या शहरावर करण्यात आलेल्या हल्ल्यात ८० हून अधिक दहशतवादी ठार झाले.

राक्काकडे जाणाऱ्या सर्व प्रमुख मार्गांवर सिरियाच्या फौजांना ताबा मिळवला आहे. आॅगस्ट २०१४ नंतर पहिल्यांदाच सिरियाच्या फाैजांना राक्कावर यशस्वी चढाई करता येऊ शकली. शनिवारी सिरियाच्या लष्कराला १५ किलोमीटरचे अंतर पार करता आले आहे, असे सिरियन ऑब्झर्व्हेटरी फॉर ह्यूमन राइटसने म्हटले आहे. दुसरीकडे सिरियातील अमेरिका व तुर्कीच्या सेनेच्या कारवाईत ३१ दहशतवाद्यांचा खात्मा झाला. शनिवारी लिबियातही इसिसविरोधी यशस्वी कारवाई झाली. दुसरीकडे गेल्या अनेक दिवसांपासून कट्टरवाद्यांच्या ताब्यातील सिर्ते बंदराला लिबियाच्या सुरक्षा दलाने पुन्हा ताब्यात घेतले आहे. सध्या सरकारी फौजांनी शहराला घेराव घातला आहे. सिर्ते शहरात इसिसचे दहशतवादी दडून बसले आहेत. त्यांचा नायनाट करून हा भाग ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यात यश मिळाल्यास इसिससाठी हा मोठा धक्का असेल.

सेवेकऱ्याच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली
ढाका | बांगलादेशामधील आश्रमातील सेवेकऱ्याच्या हत्येची जबाबदारी इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेने शनिवारी घेतली. देशाच्या उत्तरेकडील पाबनामध्ये इसिसच्या लढवय्यानेच हिंदू व्यक्तीची हत्या केली, असा दावा दहशतवादी संघटनेने दिलेल्या संदेशातून केला आहे.
एकाच आठवड्यात हिंदू पुजारी, ख्रिश्चन महिलेसह तीन जणांच्या हत्या करण्यात आल्या आहेत. फेब्रुवारीमध्ये एका पुजाऱ्याची हत्या केली होती. एप्रिलमध्ये धर्मनिरपेक्ष प्रोफेसरची हत्या झाली होती.

गल्लीबोळात रणगाडे
युद्धग्रस्त सिरिया, लिबियातील गल्लीबोळात आता रणगाडे, मॉर्टरने लढाई सुरू आहे. संयुक्त राष्ट्राचे समर्थन असलेल्या जीएनए लष्कराने लिबियात गल्लीबोळात जाऊन संघर्ष केला. जवानांनी रणगाडे, रॉकेटचाही वापर केला. जीएनएचे ११ सैनिक शांती मोहिमेत शहीद झाले.
बातम्या आणखी आहेत...