आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुन्हा भूकंप: नेपाळला बसले चार धक्केे, एक महिन्यानंतरही जखमा ओेल्याच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काठमांडू- नेपाळमध्ये आज (गुरुवार) भूकंपाचे चार सौम्य धक्के बसले. 25 एप्रिलपासून नेपाळमध्ये आतापर्यंत लहान-मोठे तब्बल 280 भूकंपाचे धक्के बसले आहेत. गुरुवारी जाणवलेल्या भूकंपामुळे कोणतीही हानी झाल्याचे वृत्त नाही.

दरम्यान, 25 एप्रिल हा दिवस नेपाळमधील नागरिक विसरू शकणार नाहीत. विनाशकारी भूकंपाने घरे उद्ध्वस्त केली. गावे आेसाड, निर्जीव ढिगाऱ्यात रूपांतरित झाली. आज महिना उलटला तरी जखमा तशाच आहेत. हजारो अाजही बेघर आहेत. तरीही घराची आेढ त्यांना गावात आणते. म्हणूनच घराच्या खाणाखुणा शोधून ढिगारे हलवण्यासाठी दिवसरात्र त्यांचे कष्ट सुरू असतात.
> 02 भूकंपाच्या धक्क्यांनी झाली होती प्राणहानी.
> 8600 नागरिकांचाभूकंपांत झाला होता मृत्यू

पुढील स्लाइडवर क्लिक करून व्हिडिओ आणि छायाचित्रांतून पाहा नेपाळमधील विध्वंस.....