आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • 84 Thousand Homeless Earthquake, Shortage Of Essential Commodities In Indonesia After The Tsunami Of 2004, The Biggest Crisis

भूकंपामुळे 84 हजार बेघर, जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा इंडोनेशियात 2004 च्या सुनामीनंतरचे सर्वात मोठे संकट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जकार्ता : पश्चिम इंडोनेशियाला बसलेल्या भूकंपाच्या तीव्र धक्क्यामुळे ८४ हजार लोक बेघर झाले आहेत. भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी यंत्रणा कामाला लागली आहे. गेल्या आठवड्यात आलेल्या या भूकंपाने १०० लोकांचा बळी घेतला. अनेक लोक जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. येथील अकेह राज्याचे यात सर्वाधिक नुकसान झाले.
हिंदी महासागरात वर्ष २००४ मध्ये आलेल्या सुनामीनंतर या भागातील ही सर्वात मोठी नैसर्गिक आपत्ती ठरली आहे.
६.५ रिश्टर स्केल तीव्रतेच्या या भूकंपात अनेक इमारती, आैद्योगिक आस्थापना, मशिदी जमीनदोस्त झाल्याचे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रवक्ते सुतोपो पुर्वो नगरोहो यांनी सांगितले.
नंतरच्या सौम्य धक्क्यांची भीती लोकांमध्ये पसरली आहे. अनेक लोक मदत छावणीत राहण्यास प्राधान्य देत असून ज्या इमारती शाबूत आहेत त्या आेसाड पडल्या आहेत.
काही मदत शिबिरांमध्ये पिण्याच्या पाण्याचा अभाव आहे. अनेक विहिरी कोरड्या पडल्यानेही नागरिकांचे पाण्याचे हाल होत आहेत. अन्न, कपडे आणि स्वच्छतेच्या सामानाचा अभाव असून मदतकार्य अपुरे पडत आहे.
इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो यांनी भूकंपग्रस्त भागाला गेल्या आठवड्यात भेट दिली. अकेह राज्याला हा दुसरा तीव्र झटका बसल्याचे ते म्हणाले.
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...