आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • 84 Year Old Ivan Krasko Weds His 24 Year Old Student

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

84 वर्षांच्या अॅक्टरने 24 वर्षांच्या विद्यार्थिनीबरोबर थाटला संसार, वाचा LOVE STORY

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रशियातील ज्येष्ठ अभिनेते इव्हान क्रॅस्को यांनी बुधवारी त्यांच्यापेक्षा 60 वर्षांनी लहान असलेल्या विद्यार्थिनीबरोबर विवाह केला आहे. विशेष म्हणजे दोघांवर या निर्णयामुळे बरीच टीकाही झाली पण आमची जोडी स्वर्गातच बनलेली असल्याचे सांगत दोघेही निर्णयावर ठाम राहिले आणि त्यांनी लग्न केले. इव्हान यांचे यापूर्वी तीन विवाह झालेले असून त्यांना सहा 6 मुले आणि 3 नातवंडे आहेत.

प्रसिद्ध अभिनेते इव्हान यांच्याबरोबर विवाह थाटणाऱ्या त्यांच्या या विद्यार्थिनीचे नाव नटालिया शेव्हेल असे आहे. छोटेखानी समारंभात आणि केवळ मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत या दोघांनी विवाह केला. बुधवारी पीट्सबर्गमध्ये हा विवाहसोहळा झाला.

इव्हान हे सेंट पीट्सबर्ग इन्स्टीट्यूट ऑफ लिबरल एज्युकेशन याठिकाणी फाइन आर्ट हा विषय शिकवत होते. त्याठिकाणी नटालिया ही त्यांनी विद्यार्थिनी होती. त्याचठिकाणी त्यांची भेट झाली. नटालियाने इव्हानसाठी कविता लिहायला सुरुवात केली. त्या कवितांचा इव्हानवर मोठा परिणाम झाला आणि या कवितांमधूनच दोघांची प्रेमकथा सुरू झाली.

इव्हान यांनी यापूर्वी तीन विवाह केले आहेत. त्यांना सहा मुलेही आहेत. विवाहानंतर पत्रकारांशी बोलताना या नवदाम्पत्याने सांगितले की, त्या दोघांना एकमेकांशिवाय राहणे कठीण झाले होते. पण आता दोघे मॉस्कोमध्येच इव्हान यांच्या अपार्टमेंटमध्ये राहणार आहेत. लग्नापूर्वी आम्ही फार गंभीर विचार केला नव्हता. पण आता आम्ही आमच्या कुटुंबाबातही विचार करत आहोत, असेही इव्हान म्हणाले. माझ्यासाठी आयुष्याची जणू नवी सुरुवात असल्याचेही ते म्हणाले.

स्टेशनवर केले प्रपोज
इव्हान यांनी सेंट पीट्सबर्ग मेट्रो स्टेशनवर गुडघ्यावर बसून नटालियाला लग्नासाठी प्रपोज केले होते. त्यांनी नटालियाला डायमंड रिंग प्रेझेंट केली. त्याच्या दुसऱ्याच दिवशी दोघांनी लग्नासाठी रजिस्ट्रेशन केले. विशेष म्हणजे इव्हान यांच्या मुलाने लग्नानंतर संपत्तीचे काय असे विचारले तेव्हा मृत्यूपत्रात काहीही बदल करणार नसल्याचे त्यांनी सांगितले. तरुणीने केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी हा पब्लिसिटी स्टंट केल्याचे एक पत्रकार म्हणाला, तेव्हा क्रॅस्को यांनी मात्र ते खरे नसल्याचे सांगितले.
पुढील स्लाइड्सवर पाहा, इव्हान आणि नटालिया यांच्या लग्नाचे PHOTOS