आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

घर लुटल्यानंतर 88 वर्षीय वृद्धेवर रेप करणार होते, या Trick ने वाचली अब्रू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - बलात्कार आणि महिला विरोधी हिंसाचाराच्या घटनांपासून 88 वर्षांच्या महिला देखील सुरक्षित नाहीत याची प्रचिती एका घटनेवरून आली आहे. पण, अगदी हुशारीने या महिलेने डोक्याचा वापर करून स्वतःची अब्रू वाचवली. पेन्सिलव्हेनिया येथे राहणाऱ्या वयोवृद्ध महिलेने आपल्या घरावर पडलेल्या दरोड्याचा प्रसंग पोलिसांना सांगितला. यानंतर ती कशी वाचली हे देखील जगाला सांगितले. 

 

ते 3 शब्द ऐकून दरोडेखोर पसार...
अमेरिकेच्या पेन्सिलव्हेनिया प्रांतात राहणाऱ्या 88 वर्षीय हेलेन रेनॉल्ड्स यांच्या घरावर एकदा दरोडा पडला होता. त्यावेळी त्या घरात एकट्याच होत्या. घरात घुसलेल्या सशस्त्र दरोडेखोरांनी आपले तोंड पूर्णपणे लपवलेले होते. एक-एक करून घरातील सगळ्याच महागड्या वस्तू ते उचलत होते. ते दोन जण होते. घर लुटल्यानंतर ते दोघे हेलेनच्या जवळ गेले. तिचे हात-पाय बांधून तोंडावर चिकट टेप लावला. कसे-बसे तिने आपल्या तोंडावरील टेप काढायला लावला. यानंतर तिने 'मला HIV आहे' आणि यामुळेच आपल्या पतीचा मृत्यू झाला असे खोटे कथानक सांगितले. पण, दरोडेखोरांनी काहीच विचार न करता भितीपोटी घटनास्थळावरून पळ काढला. ही घटना फेब्रुवारी महिन्याची असली तरीही अमेरिकेतील माध्यमांवर नुकतेच तिने दिलेली मुलाखत चर्चेत आहे.

बातम्या आणखी आहेत...