आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिकेत 89 टक्के लोकांकडे बंदुका, 50 वर्षांत 15 लाख बळी; वर्षाला 12 हजार लोकांचा मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लास वेगास- अमेरिकेच्या लास वेगासमध्ये ९/११ नंतरचा सर्वात मोठा नरसंहार घडून आला आहे. ६४ वर्षीय वयोवृद्धाने संगीत समारोहातील रसिकांवर अंदाधुंद गोळीबार करत ५८ बळी घेतले. यात ५०० पेक्षा जास्त लोक जखमी झाले. या हिंसाचारानंतर अमेरिकेत पुन्हा शस्त्रसंस्कृतीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. 

आजार नियंत्रण संरक्षण केंद्रानुसार (सीडीसी), अमेरिकेत बंदुकीच्या हल्ल्यात दरवर्षी १२ हजार मृत्यू होतात. मागच्या ५० वर्षांत अशा घटनांत अमेरिकेत १५ लाखांहून अधिक बळी गेलेे. यात अंदाधुंद गोळीबार हत्येशी संबंधित लाख मृत्यूंचाही समावेश आहे. उर्वरित बळी आत्महत्या, चुकीने झालेला गोळीबार कायदेशीर कारवाईचे आहेत. अमेरिकेत शस्त्रास्त्र बाळगणे हा कायदेशीर अधिकार आहे. नागरिक दुकानातून सहज शस्त्रे विकत घेतात. आता लोक याच्याशी संबंधित कायदा आणण्याची मागणी करत आहेत. अमेरिकेतील शस्त्रास्त्र उद्योग वार्षिक ९१ हजार कोटीांचा महसूल देतो. त्यामुळे अमेरिकेतील शस्त्रास्त्र निर्माते याचा विरोध करत आहेत. ते निवडणुकीत राजकीय दलांना घसघशीत निधी देतात. वर्षांपूर्वी शाळेत गोळीबार झाल्यानंतर बराक ओबामा यांनी शस्त्रास्त्र कायदा आणण्याची मागणी केली होती. मात्र, संसदेतील ७० टक्के लोकप्रतिनिधींनी त्यास विरोध केला होता. त्यामुळे अद्यापही कायदा बनू शकला नाही. दुसरीकडे सत्तेत येण्यापूर्वी ट्रम्पसुद्धा शस्त्रास्त्र बाळगण्याचे समर्थन करत होते. मात्र, मागच्या वर्षी ऑरलँडोच्या नाइट क्लबमधील घटनेनंतर त्यांनी याबाबत विरोधी प्रतिक्रिया दिली होती. क्लबकडे शस्त्रे असती तर अनेक लोकांचे प्राण वाचवता आले असते, असे तेव्हा ते म्हणाले होते. 

शस्त्र संस्कृती नष्ट करण्यासाठी अाेबामा रडले; तरीही संसदेत ७० % समर्थकांपुढे हतबल 
दाेन वर्षांपूर्वी अाॅरेगाॅनमधील महाविद्यालयात जणांची हत्या झाल्यानंतर तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक अाेबामा यांना रडू काेसळले हाेते. ते म्हणाले, अाज आपण पाऊल उचलले नाही, तर अशा घटना थांबणार नाहीत. मी त्या मुलांचा विचार करताे तेव्हा वेडा हाेताे. अाम्हा सर्वांनी मिळून ‘शस्त्रास्त्र धाेरण’ अाणले पाहिजे; परंतु अमेरिकी काँग्रेसचे ७० % सदस्य शस्त्रांचे समर्थक अाहेत. त्यामुळे अाेबामा त्यांच्यापुढे हतबल ठरले. 
 
मदतीची भावना 
हे छायाचित्र लास वेगासचे असून हल्ल्याची भीषणता दाखवण्यासाठी पुरेसे आहे. हल्ल्यानंतर संपूर्ण शहरवासी मदतीसाठी धावले. तीन तासांत शहरातील रक्तपेढ्यात रक्तदानासाठी लांबच्या लांब रांगा लागल्या.

एकट्या अमेरिकेमध्ये सुमारे ३१ काेटी शस्त्रे; जगभरातील एकूण बंदुकांच्या ४८ टक्के 
> जगभरातील एकूण सिव्हिलियन बंदुकांपैकी ४८% केवळ अमेरिकी नागरिकांकडे अाहेत. सुमारे ३१ काेटी शस्त्रे अमेरिकी लाेकांकडे अाहेत. 
> ८९ % अमेरिकी लाेक जवळ बंदूक बाळगतात. यातील ६६ % लाेक एकापेक्षा जास्त बंदुका बाळगतात. 
> अमेरिकेत बंदुका बनवणाऱ्या उद्याेगांची वार्षिक उलाढाल ९१ हजार काेटींची अाहे. २.६५ लाख नागरिक या व्यवसायाशी निगडित अाहेत. अमेरिकी अर्थव्यवस्थेत शस्त्रांच्या विक्रीतून ९० हजार काेटी रुपये येतात. 
> दरवर्षी एक काेटीहून अधिक रिव्हाॅल्व्हर, पिस्तूल यासारख्या बंदुका येथे बनतात. 
(अाकडेवारी: सीएनएन, सीडीस, अायबीअायएस) 

बंदुकीच्या हिंसेमुळे वार्षिक २० हजार काेटींचे नुकसान
शस्त्रांच्यावापरातून हाेणारी हिंसा मृत्यूंमुळे २० हजार काेटींचे नुकसान झाले. हा जीडीपीचा १.४ % भाग अाहे. 

जागतिक माध्यमे 
बीबीसी
: अमेरिकेच्याबंदूक संस्कृतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित. अमेरिकी नागरिकांना बंदुकांबद्दल एवढे प्रेम का? तो या प्रकारात जगात सर्वात पुढे का आहे? असे लिहिले.
 
फॉक्स न्यूज:  ‘वेगासइन शॉक’ शीर्षकाने अमेरिकी इतिहासातील सर्वात मोठी गोळीबाराची घटना असा उल्लेख. हल्लेखोराची ५८ जीव घेऊन स्वत: आत्महत्या. 

द सन : फेस ऑफ इव्हिल शीर्षकासोबत अमेरिकेच्या बंदूक प्रेमावर प्रश्न उपस्थित केला. अमेरिकेने असे हल्ले रोखण्यासाठी कडक बंदूक धोरण अवलंबावे, असे म्हटले. 

समाज माध्यमे 
अत्यंत द:ुखद दिवस. लास वेगासच्या लोकांसोबत माझे प्रेम आणि प्रार्थना. ज्यांनी मदत केली त्या सर्व लोकांचे आभार. 
- माइक टायसन, मुष्टियोद्धा 

लासवेगासच्या पीडितांसोबत माझी आणि मिशेलची प्रार्थना आहे. या भ्याड हल्ल्यातील पीडितांच्या कुटुंबीयांसोबत आमच्या संवेदना आहेत. 
- बराक ओबामा, माजी अध्यक्ष 

आमच्यासंवेदना पुरेशा नाहीत. सर्व पक्षांनी मतभेद दूर करून एकजूट व्हावे. असे पुन्हा घडू नये यासाठी आपल्याला एकत्रित प्रयत्न करावे लागतील. 
- हिलरी क्लिंटन, माजी परराष्ट्र मंत्री 
 
पुढील स्लाइडवर पाहा, 
> ९/११ नंतर आतापर्यंतचा सर्वात मोठा नरसंहार, या वर्षी गोळीबाराच्या ४०० घटना... 
बातम्या आणखी आहेत...