आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंडोनेशियात बोट बुडून ९ जणांचा मृत्यू, २१ जणांचे प्राण वाचले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जकार्ता- मासेमारी करणारी बोट बुडाल्याने ९ जणांचा मृत्यू झाला. लाकडी बोटीतून ३० जण जात होते. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली.  बोटीतील  २१ जणांचे प्राण वाचवण्यात बचाव पथकाला यश आले आहे. तीन जण अद्यापही बेपत्ता आहेत. ही बोट का बुडाली याचे कारण मात्र समजू शकले नाही, असे वाहतूक मंत्रालयाचे प्रवक्ते लॉलन पानजैतन यांनी सांगितले.

ही बोट अधिकृत बंदरावरून प्रवासावर निघाली नव्हती. नियोजित प्रवासासाठी सरकारची परवानगीदेखील घेण्यात आली नव्हती. इंडोनेशियात सुमारे १७ हजार बेटे आहेत. त्यावरून अनधिकृत प्रवास केला जातो. हा प्रवास पूर्णपणे असुरक्षित असतो. कारण या प्रवासादरम्यान सुरक्षेच्या कोणत्याही नियमांचे पालन केले जात नाही. त्यामुळे बोटींचे अपघात वारंवार घडतात.  

गेल्या महिन्यात जकार्ताहून टिडूंग बेट यादरम्यानच्या सागरी प्रवासात २० जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. या बोटीने अचानक पेट घेतल्याने ही घटना घडली होती. तत्पूर्वी नोव्हेंबरमध्ये आसनक्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहून नेणाऱ्या स्पीड बोटीला अशा प्रकारचा अपघात झाला होता. त्यात मोठी प्राणहानी झाली होती. ५४ जणांचा त्यात मृत्यू झाला होता. बोटीतून ९८ जण प्रवास करत होते.   
बातम्या आणखी आहेत...