आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेत विमान कोसळले, वैमानिकासह नऊ जणांचा मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन- अमेरिकेतील अलास्का प्रांतात गुरुवारी एक विमान कोसळले. या दुर्घटनेत वैमानिकासह सर्व नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. खराब हवामानामुळे विमान कोसळल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. प्रोमेक एअर कंपनीचे हे विमान आहे.

DHC-3T Otter हे विमान केत्चीकन शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या इला तळ्याजवळ कोसळले. यात वैमानिकासह नऊ जण होते. दुर्घटनेत सगळ्यांचा मृत्यु झाल्याची माहिती सिएटल येथील प्रोमेक एअर कंपनीने दिली आहे.

कोस्टगार्ड आणि रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचले असून मदतकार्य सुरु झाले आहे. इला तळ्याजवळील डोंगराळ भागात एका हेलिकॉप्टरने एका आणखी विमानाचा ढिगारा पाहिला असल्याची माहिती मिळाली आहे.

कोस्टगार्ड ऑफिसर लॉरेन स्टीनसन यांनी सांगितले की, ही दुर्घटना स्थानिक वेळेनुसार दुपारी सव्वा दोन वाजता घडली. त्यानंतर रेस्कू ऑपरेशन सुरु करण्‍यात आले आहे. खराब हवामानामुळे नव्हे, तांत्रिक बिघाडामुळे हे विमान कोसळल्याचा दावा, एका स्थानिक रेडिओ चॅनलने केला आहे. विमानातील सर्व प्रवासी एमएस. वेस्टर्डम शिपचे क्रू मेंबर्स होते.