आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS 9 वर्षीय श्रेयाच्या ‘गरम मसाला’ बर्गरने जिंकले ओबामांचे मन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो : व्हाइट हाऊसमध्ये श्रेयाबरोबर बोलताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा - Divya Marathi
फोटो : व्हाइट हाऊसमध्ये श्रेयाबरोबर बोलताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा
न्यूयॉर्क - मूळची गुजराती आणि अमेरिकेत राहणाऱ्या नऊ वर्षीय श्रेया पटेलने तयार केलेल्या ‘गरम मसाला’ कुनिया बर्गरची सघ्या संपूर्ण अमेरिकेत चर्चा आहे. त्याचे कारण म्हणजे, हे बर्गर जेव्हा राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांच्या पत्नी मिशेल यांनी खाल्ले तेव्हा त्यांना ते खूपच आवडले. मिशेल यांना तर ते एवढे आवडले की, त्यांनी श्रेयाला व्हाइट हाउसमध्ये त्यांच्याबरोबर डिनरसाठी आमंत्रितही केले. श्रेयाने ही चॅम्पियनशीप जिंकण्याबरोबरच ओबामांचे मनही जिंकले.

अमेरिकेच्या इलिनॉइसमध्ये राहणा-या 55 लहानग्या कुकमध्ये श्रेयाचा समावेश होता. चौथ्या वार्षिक स्टेट डिनरसाठी त्यांना आमंत्रित करण्यात आले होते. या स्पर्धेत प्रत्येकाला एक रेसिपी तयार करायची होती. हा पदार्थ चवदार आणि आरोग्यदायीही असावा अशी त्यामागे अट होती.

याबाबत श्रेयाने सांगितले की, या खास बर्गरची रेसिपी तिने आजीच्या मदतीने तयार केली होती. कारण त्या दोघींनाही सँडविच आवडते. आजी अनेक चांगले पदार्थ तयार करते आणि मी त्यांची मदत करते. आजीचे वैशिष्ट्य म्हणजे नेहमी पदार्थाला भारतीय चव देण्याचा प्रयत्न करते असे श्रेयाने सांगितले. श्रेया वयाच्या तिसऱ्या वर्षापासून स्वयंपाकात मदत करते. या बर्गरमध्ये मसाल्यांबरोबर, जीरे, अद्रक आणि मिरचीचाही वापर केल्याचे तिने सांगितले.

पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित PHOTOS
बातम्या आणखी आहेत...