आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

US मध्ये 9 वर्षांचा पार्थ पटेल झाला पोलिस ऑफिसर, वाचा का रडले लोक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्युजर्सी (अमेरिका)- येथील 9 वर्षाच्या पार्थ पटेलला एका दिवसासाठी पोलिस निरिक्षक करण्यात आले होते. तो कॅन्सरग्रस्त आहे. त्याच्याकडे काही दिवसांचेच आयुष्य असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. यावेळी घेण्यात आलेल्या परेडमध्ये शेकडो पोलिस आणि अमेरिकी नागरिकांनी त्याला सॅल्युट केले. पण त्यानंतर झालेल्या समारंभात अनेकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. एवढ्या चिमुकल्याच्या डोक्यावर मृत्यूच्या छटा बघून सहजच रडू कोसळले.
सुपरहिरो बॅटमॅन झाला पार्थचा ड्रायव्हर
पार्थला न्युजर्सी पोलिसांचा युनिफॉर्म घालण्यात आला. यावेळी झालेल्या परेडमध्ये पोलिसांनी त्याला सॅल्युट केले. सुपरहिरो बॅटमॅन चक्क त्याचा ड्रायव्हर झाला. यावेळी पार्थच्या शाळेच्या शिक्षकांसह अनेक पालक आणि नागरिक उपस्थित होते. कॅन्सर झालेल्या पार्थच्या चेहऱ्यावर यावेळी हास्याची लकेर होती. पण लोकांचे डोळे पाणावले होते.
पोलिस ऑफिसरने केले पार्थचे स्वप्न साकार
न्युजर्सी येथील पोलिस अधिकारी अॅंड्रियन म्युरल यांना समजले, की पार्थला कॅन्सर आहे. त्यानंतर त्यांनी त्याच्यासाठी काही तरी खास करण्याचे ठरवले. पार्थला मोठे होऊन पोलिस अधिकारी व्हायचे होते. त्यामुळे म्युरल यांनी त्याला एक दिवसासाठी पोलिस अधिकारी बनवण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी पोलिस विभाग आणि सामान्य जनतेची मदत मिळाली. पार्थला गौरविण्यासाठी तब्बल 100 पेक्षा जास्त पोलिस आणि फायर ब्रिगेडचे जवान उपस्थित होते.
स्टुडंट्स आणि टीचर म्हणाले ‘लेट्स गो पार्थ’
पार्थची परेड आयोजित करण्यात आली तेव्हा रस्त्याच्या दुतर्फा शाळेचे विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते. ‘लेट्स गो पार्थ’ असे म्हणत ते पार्थला चिअर करत होते. शिक्षिका केली लोमेक्सने पार्थ माझा सुपरहिरो आहे असे म्हटले. त्यानंतर त्यांना रडू कोसळले. त्यानंतर पार्थच्या शाळेत एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पार्थ या आजाराला हरवून दाखवेल अशी आशा यावेळी सर्वांनी व्यक्त केली.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, पोलिस अधिकारी पार्थ पटेलचे फोटो....
बातम्या आणखी आहेत...