आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चर्चेच्या थेट प्रक्षेपणातून ९० लाख डॉलरचा निधी, ट्रम्प यांच्या प्रचार मोहिमेचा दावा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या गुरुवारच्या चर्चेतून सुमारे ९० लाख डॉलरचा निधी उभारल्याचा दावा त्यांच्या प्रचार मोहिमेकडून केला आहे. फेसबुकच्या थेट प्रक्षेपणातूनही हा निधी संकलित करण्यात आला आहे. दीड लाख दात्यांनी ट्रम्प यांच्या प्रचारास हातभार लावला आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.
ट्रम्प यांच्या पाठिंब्यात चांगलीच वाढ झाली आहे. त्यामुळे निधी उभारणीच्या प्रयत्नांना यश मिळू शकले. आता दीड लाखावर देणगीदारांची नावे जमली आहेत. राष्ट्राध्यक्षपदाच्या पहिल्या चर्चेनंतरचे हे पहिलेच फेसबुकवरील थेट प्रक्षेपण आहे. पहिली चर्चा सुमारे २ कोटी ४० लाख लोकांनी थेट पाहिली होती. त्यानंतर ८० लाखांवर व्हिडिओ शेअर झाले, असे मोहिमेकडून सांगण्यात आले.

मिनिटांचेही विश्लेषण
अमेरिका जागतिक महासत्ता असल्याने राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारांतील चर्चाही जगभरातील माध्यमांसाठी तितकीच चर्चेचा विषय ठरली. हे लक्षात घेऊन ट्रम्प यांच्या समर्थकांनी लाइव्ह चर्चेच्या मिनिटांचेही विश्लेषण केले आहे. ही चर्चा ‘न भूतो न भविष्यति’ झाली. हे सांगण्यासाठी आकड्यांची मदत घेण्यात आली. लाइव्ह प्रक्षेपण पाहणाऱ्यांची संख्या सुमारे १ कोटी १० लाखांहून अधिक होती. अर्थात एवढ्या लोकसंख्येने छोट्या पडद्यासमोर सतत एवढा वेळ दिल्यास तो कालावधी २२ वर्षे होतो, असा दावाही ट्रम्प टीमकडून करण्यात आला.
पुढे वाचा, ट्रम्प यांच्याबाबत काय म्हणाले ओबामा..
बातम्या आणखी आहेत...