आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 900 May Be Dead At Mediterranean Sea Rising Toll On Migrants Leaves Europe

पिंज-यात अडकलेले 300 लोक उंदरांप्रमाणे मृत पावले, एकूण 950 प्रवाशी होते

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वालेटा/कटानिया - युध्‍दात होरपळत असलेल्या लीबियातून जीव वाचवण्‍यासाठी 800 लोक रविवारी(ता.19) युरोपाकडे निघले असताना जहाज बुडले. या दुर्घटनेत त्या सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला. मात्र एका म‍ाहितीनुसार, बोटीत 950 पेक्षा जास्‍त प्रवाशी होते. त्यात 300 पेक्षा जास्त महिला आणि मुले होते. जहाज भूमध्‍ये समुद्रात बुडत असताना जवळ-जवळ 300 लोक पिंज-यात बंद होते असे सांगितले जात आहे. आतापर्यंत 27 लोकांना वाचवण्‍यात यश आले आहे, असे वृत्त ब्रिटिश वृत्तपत्र 'द टेलिग्राफ'ने दिले आहे. संयुक्त राष्‍ट्र संघाने 800 लोक मृत पावल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
इटलीचे एक बोट सोमवारी 26 मृतदेह घेऊन माल्टाच्या किना-यावर पोहोचले. बचाव पथक आणि हेलिकॉप्टर बेपत्ता झालेल्या प्रवाशांचा शोध घेत आहे. जहाजमध्‍ये एकूण किती लोक होते,याबाबत निश्चित सांगता येत नाही, असे इटलीचे पंतप्रधान मातेओ रेंजी यांनी सांगितले. दुर्घटना जिथे झाली आहे त्याठिकाणी भूमध्‍य समुद्र पाच किलोमीटरपेक्षा जास्त खोल आहे. यामुळे बचाव पथकाला अडथळ्यांना तोंड द्यावे लागत आहे, असे इटालियन बॉर्डर फोर्सचे जनरल अंतोनियो यांनी परिस्थितीबाबत स्पष्‍टीकरण दिले.
जहाज कसे बुडाले ?
दुर्घटनेत वाचलेला एक बांगलादेशी नागरिकाने सांगितले, की जहाजवर 950 पेक्षा जास्त लोक होते. जवळून जाणा-या मर्चंट जहाजाची मदत मिळावी यासाठी सर्व प्रवाशी एकाच बाजूला पळाले यामुळे जहाजचा तोल बिघडला. दुर्घटना लीबियाच्या समुद्र किना-सापासून 70 किमीवर घडला.
युरोपीय संघ सक्रिय
जहाज दुर्घटनेनंतर आता युरोप‍ियन संघाने अवैध प्रवासावर कडक पावले उचलण्‍याचा निर्णय घेतला आहे. युरोपियन संघातील देशांच्या परराष्‍ट्र मंत्री लक्झेंबर्ग येथे अशा दुर्घटना होऊ नये या करिता रणनीति आखत आहे. लीबियातील अराजकता थांबत नाही, तोपर्यंत अशा घटना होत रा‍हतील,असे माल्टाचे पंतप्रधान म्हणाले.

पुढील स्लाइड्सवर पाहा, भूमध्‍य समुद्रात जहाज बुडाल्यानंतरची स्थिती...