Home »International »Other Country» 9/11 Attack- Most Controversial Photographs

9/11: लोक मरत होते अन् यांची सुरू होती 'मस्ती', पाहा वादग्रस्त PHOTOS

दिव्यमराठी वेब टीम | Sep 12, 2017, 12:16 PM IST

  • 9/11 हल्ल्याच्या दिवशीचा टिपलेला हा फोटो थॉमस होएपकरने 2006 मध्ये प्रकाशित केल्यानंतर मोठा वादंग उभा राहिला होता.
इंटरनॅशनल डेस्क- 11 सप्टेंबर 2001 रोजी अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला झाला होता. यात सुमारे तीन हजार लोक मारले गेले. त्याच दिवशी हल्ल्यानंतर काही तासाने जर्मनीच्या एका फोटोग्राफरने एक फोटो क्लिक केला होता. हा फोटो त्याने साधारणपणे 5 वर्षांपर्यंत बाहेर येऊ दिला गेला नाही. तो असा फोटो होता, जो हल्ला झालेल्या घटनेपासून काही अंतरावर बसलेल्या लोकांचा. या फोटोमध्ये जळत्या इमारतीतून निघणारे धुराचे लोट स्पष्टपणे दिसत आहेत. मात्र तेथे उपस्थित असलेले लोक एकदम आरामात व रिलॅक्स मूडमध्ये गप्पा मारताना दिसत आहेत. थॉमस होएपकरने 2006 मध्ये हा फोटो प्रकाशित केल्यानंतर यावर मोठा वादंग उभा राहिला होता.
काय म्हणाले फोटोत दिसणारे लोक...
हा फोटो पाहिल्यानंतर अनेक लोकांनी आपापली मते मांडली. काही लोक म्हणाले की, अमेरिका अद्यापही एक राष्ट्र म्हणून विकसित होऊ शकले नाही. कारण कुठे काय सुरू आहे याच्याशी फारसे तिथल्या कुणालाच काही घेणे-देणे नसते. मात्र या फोटोत दिसणारे लोक स्वतःचा बचाव करताना म्हणाले की, एक तर आम्हाला न सांगताच हा फोटो क्लिक केला गेला. पुढे ते म्हणाले की, आम्हाला या घटनेची पूर्ण माहिती होती त्याच्याप्रती संपूर्ण संवेदना होती. तसेच त्या घटनेचा आमच्यावरही मोठा आघात झाला होता. ते म्हणाले की, होय आम्ही निवांतपणेच बसलो होतो पण फोटोग्राफरने आमची सिच्यूएशन चुकीच्या पद्धतीने मांडली.
पुढील स्लाईड्सवर पाहा, वेगवेगळ्या घटनांतील असेच काही असंवेदनशील PHOTOS...

Next Article

Recommended