आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

9/11: जगाला धडा शिकविण्याची क्षमता ठेवणारी अमेरिका तेव्हा ढसाढसा रडली...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क- अमेरिकेवरील 9/11 हल्ल्याला आज 16 वर्ष पुर्ण झाली. 2001 मध्ये अल कायदाच्या 19 दहशतवाद्यांनी आजच्याच दिवशी अमेरिकेत वर्ल्ड ट्रेड सेंटर, पँटॉगॉन आणि पेनिसिल्व्हेनियामध्ये एकाच वेळी मोठे दहशतवादी हल्ले घडवले होते. दहशतवाद्यांनी चार पॅसेंजर एअरक्राफ्टचे अपहरण केले होते. त्यापैकी दोन प्रवासी विमाने दहशतवाद्यांनी वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या टॉवरमध्ये घुसवली. तर तिस-या विमानाने पेंटागॉनवर हल्ला केला. तर चौथे विमान पेनिसिल्व्हेनियामध्ये क्रॅश झाले.
 
या हल्ल्यामध्ये 400 पोलिस अधिकारी आणि फायर फायटर्ससह 2983 जणांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यात मारल्या गेलेल्यांमध्ये 57 देशांच्या नागरिकांचा समावेश होता. या हल्ल्यानंतर अमेरिका मूळापासून हादरली होती. खरं तर जगालाच नव्हे तर संपूर्ण पृथ्वीला धडा शिकविण्याची क्षमता बाळगून असलेली अमेरिका त्यावेळी हतबल झालेली दिसली होती. अमेरिका त्यावेळी ढसा ढसा रडली होती. हल्ल्यामागे अल कायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेनचा हात होता. या हल्ल्याचा बदला घेत अमेरिकेने 2 मे 2011 रोजी पाकिस्तानच्या अबोटाबादमध्ये ओसामाचा खात्मा केला होता.
 
अमेरिकेसह जगभराला हादरवून सोडणाऱ्या या हल्ल्यानंतर अमेरिकेने सुरक्षा धोरणामध्ये काही महत्त्वाचे बदल केले आहेत. अमेरिकेत येणाऱ्या पर्यटकांवरही बारीक नजर ठेवण्यात येत होती. अनेक देशांमध्ये दिल्या जाणाऱ्या व्हिसामध्येही कपात करण्यात आली आहे. त्याशिवायही अनेक उपाययोजना करत अमेरिकेने त्यानंतर पुन्हा दुसरा दहशतवादी हल्ला होऊ दिला नाही व होणार नाही याची पुरेपूर खबरदारी घेतल्याचे दिसून येते.
 
पुढील स्लाईड्सवर पाहा, 9/11 हल्ल्याचे काही निवडक PHOTOS....
बातम्या आणखी आहेत...