आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील ९०% लोकसंख्या प्रदूषित हवेत घेते श्वास, विविध स्थळांच्या प्रदूषण स्तराचा अहवाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जिनिव्हा - जगातील प्रत्येक १० मागे व्यक्ती प्रदूषित हवेत श्वास घेतात. जगभरात दरवर्षी दशलक्ष मृत्यू केवळ श्वसनविकारांमुळे होत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात म्हटले आहे. वायू प्रदूषणावर मात करण्यासाठी युद्धपातळीवर उपाय योजणे अत्यावश्यक असल्याचे या अहवालात ठळकपणे सांगण्यात आले. संयुक्त राष्ट्राच्या सर्वेक्षणातील आकडेवारी प्रदूषणाची भयावह स्थिती सांगण्यास पुरेशी असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या सार्वजनिक आरोग्य विभाग प्रमुख मारिया नेयरा यांनी सांगितले.
शहरी भागात ही समस्या उग्ररूप धारण करत आहे. ग्रामीण भागात हवा शुद्ध असल्याचा गैरसमज अाहे. मात्र, तेथील वायू प्रदूषणाची कारणे वेगळी अाहेत. स्थिती सर्वत्र बिकटच असल्याचे मत जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांनी व्यक्त केले. गरीब देशांत वायू प्रदूषण विकसित देशांच्या तुलनेत अधिक आहे. मात्र, जगातील बहुतांश भूभागाला या समस्येने ग्रासले असल्याचे यात म्हटले आहे.
श्वसनविकार होण्याचे प्रमुख कारण
प्रदूषित हवेतील सल्फेट, काळे कार्बन फुप्फुसांसाठी अपायकारक असून त्यामुळे बहुतांश श्वसनविकार बळावत अाहेत. १० मायक्रोग्रॅम पर क्यूबिक मीटरमध्ये या दूषित घटकांचे प्रमाण पीएम २.५ आहे. उपग्रहांद्वारे घेतलेल्या चाचणीनुसार हे प्रमाण स्पष्ट झाले. मात्र, यात विकसनशील देशांच्या वायू प्रदूषणाची आकडेवारी दिलेली नाही.
घरातील हवाही प्रदूषित: घराबाहेरीलवातावरण प्रदूषित आहेच. शिवाय गरीब देशांमध्ये घरगुती वापरासाठी उपलब्ध इंधनही शुद्ध नसल्याने घरातही श्वसनायोग्य हवा नाही. कमी मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये श्वसनविकारामुळे दगावणाऱ्यांची संख्या अधिक म्हणजे ९० % आहे.
सार्वजनिक आरोग्याची आणीबाणी : कचराव्यवस्थापन, वाहनांची संख्या घटवणे, घरगुती वापरासाठी स्वच्छ इंधन पुरवठा यासाठी सरकारी पातळीवर प्राधान्याने प्रयत्न होणे गरजेचे आहे. सार्वजनिक आरोग्याची आणीबाणी घोषित करण्याची वेळ आली असल्याचे यात म्हटले आहे.
बातम्या आणखी आहेत...