आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • 1 Killed 4 Injured At Trump Tower Blaze In Manhattan, President Boasts Building Quality, Users Get Angry

ट्रम्प टॉवरला आग, 1 ठार; तरीही राष्ट्राध्यक्ष म्हणतात बिल्डिंग मजबूत बांधली होती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क - अमेरिकेतील मॅनहॅटन शहरात ट्रम्प टॉवरच्या 50 व्या मजल्याला रात्री अचानक आग लागली. या आगीत एका कलाकाराचा मृत्यू झाला. तसेच 4 जण गंभीर जखमी झाले. विशेष म्हणजे, या इमारतीला आग लागल्याचे वृत्त ऐकूण सर्वत्र हळहळ व्यक्त होत असताना राष्ट्राध्यक्षांच्या ट्वीटमुळे सगळेच संतप्त आहेत. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी या इमारतीवर ट्वीट केले. पण, त्यामध्ये त्यांनी पीडितांविषयी सहानुभूती तर दूर त्यांचा उल्लेख देखील केला नाही. उलट, आपल्या कंपनीने बांधलेले हे टॉवर किती चांगले आहे याचेच कौतुक केले. त्यावरून त्यांच्या ट्वीटला संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. 

 

काय म्हणाले ट्रम्प...
- अमेरिकेतील न्यूयॉर्कचे उपनगर मॅनहॅटन येथील ट्रम्प टॉवरला शनिवारी रात्री आग लागली. त्याच इमारतीमध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचेही घर आहे. त्यांचे न्यूयॉर्कमधील हे बेस मानले जाते. आगीवरून सर्वत्र हाहाकार असताना ट्रम्प यांनी एक ट्वीट करून लोकांच्या भावना भडकावल्या.
- ट्रम्प यांनी ट्वीट केले, की "ट्रम्प टॉव्हरला लागलेली आग आटोक्यात आली आहे. ही इमारत अतिशय मजबूत आणि चांगल्या प्रकारे बांधण्यात आली होती. फायरमन आणि टीमने अतिशय चांगले काम केले. Thank You."

 

लोक म्हणाले, 'ट्रम्प दिवाळखोर असल्याचा ज्वलंत पुरावा'
- सोशल मीडियावर या ट्वीटवर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. त्यापैकी अनेकांनी ट्रम्प यांच्या ट्वीटला उत्तर देऊन राग व्यक्त केला. एक यूझर म्हणाला, म्हणून मी हिलेरींना मत दिले होते. 
- दुसऱ्या एका व्यक्तीने ट्वीट केले, की 'मिस्टर डोनाल्ड ट्रम्प त्या इमारतीमध्ये एक माणूस मेला आहे. आपण, कशा प्रकारची व्यक्ती आहात.'
- या प्रतिक्रियांमध्ये बहुतांश लोकांनी ट्रम्प यांच्या दिवाळखोरी आणि सायको असल्याचा हा एक जिवंत पुरावा असल्याचे म्हटले. इमारतीमध्ये माणसं मरतात आणि एक राष्ट्राध्यक्ष ती इमारत आपण बांधलेली असल्याने त्याचे कौतुक करत बसतो. असेही म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...