आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अफगाणिस्तानात हिंदू, शिखांना लक्ष्य करत केलेल्या आत्मघातकी बाँब हल्ल्यात 10 ठार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काबूल - अफगाणिस्तानच्या नानगरहार प्रांतातील जलालाबाद शहरात रविवारी शीख आणि हिंदु बांधवांना लक्ष्य करत आत्मघातकी बाँबस्फोट करण्यात आला. या बॉम्बस्फोटात 10 जणांचा मृत्यू झाला. 
 
नानगरहार प्रांताचे पोलिसविभाग प्रमुख जनरल गुलाम सनायी स्तानेकझई यांनी सांगितले की, या हल्ल्यामध्ये इतर इतर पाच जण जखमी झाले आहेत. गव्हर्नर कंपाऊंडकडे येणाऱ्या गटाला या हल्ल्यात लक्ष्य करण्यात आले होते. अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष रविवारी या प्रांताला भेट देणार होते. त्यांना भेटण्यासाठी हे सर्व निघालेले होते. अद्याप कोणीही या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. मात्र या प्रांतात तालिबान आणि इस्लामिक स्टेटशी संबंध असलेल्या काही संघटना सक्रीय असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. 
 
अफगाणिस्तानात हिंदु आणि शीख अल्पसंख्याक आहेत. अनेकदा त्यांना मुस्लीम कट्टरवाद्यांकडून लक्ष्य केले जाते. सध्या अफगाणिस्तानात या समुदायांचे मोजके 1000 च्या जवळपास लोक आहेत.

बातम्या आणखी आहेत...