आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेत हवेतच धडकले दोन ट्रेनी एअरक्राफ्ट, 19 वर्षांच्या भारतीय तरुणीसह तीन जण ठार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये एका फ्लाइट स्कूलचे दोन ट्रेनी एअरक्राफ्ट हवेत धडकले. या अपघातात 19 वर्षाच्या भारतीय वंशाच्या निशा सेजवालसह तिघांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात 17 जुलैचा आहे. 'मियामी हेराल्ड' ने फेडरल एव्हीएशन अॅडमिनिस्ट्रेशनच्या हवाल्याने सांगितले की, ही दोन्ही विमाने ट्रेनी पायलट उडवत असावेत अशी शक्यता आहे. तीन ठार झाल्याचे पोलिसांनी सांगितले असून आणखी एक मारला गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मियामी डेड काऊंटीच्या मेयरने दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही एअरक्राफ्टस् पायपर पीए-34 आणि सेसना 172 डीन इंटरनॅशनल फ्लाइट स्कूलचे होते. या स्कूलच्या विमानांच्या 2007 पासून 2017 पर्यंत 12 हून अधिक दुर्घटना घडल्या आहेत. 

 

निशाच्या फेसबूक पेजनुसार तिने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्येच डीन इंटरनॅशनल फ्लाइट स्कूलमध्ये प्रवेश घेतला होता. तिने दिल्लीच्या एमिटी पब्लिक स्कूल आणि डीएव्ही मॉडेल स्कूलमधूनही शिक्षण केले होते. मृतांमध्ये जॉर्ज सांचेज (22) आणि राल्फ नाइट (72) यांचाही समावेश होता. एका विमानातून दोन आणि दुसऱ्या विमानातून तिसऱ्या व्यक्तीचा मृतदेह मिळाला. मियामी पोलिसांच्या मते, दोन्ही विमानांद्वारे विद्यार्थ्यांना ट्रेनिंग दिले जात होते. यामध्ये एक पायलट एक ट्रेनर किंवा एक ट्रेनर आणि एक विद्यार्थी असण्याची शक्यता आहे. 


मासे पकडण्यासाठी गेलेल्या व्यक्तीने तयार केला व्हिडिओ
या दुर्घटनेचा साक्षीदार ठरला डॅनियल मिरालेस नावाचा व्यक्ती. हा व्यक्ती एअरपोर्ट जवळच्या कालव्यात मासे पकडण्यासाठी आलेला होता. त्याने दोन्ही विमाने धडकल्याचा व्हिडिओही तयार केला होता. डॅनियलने सांगितले, मी एख विचित्र आवाज ऐकला. असे वाटत होते की, विमानांचा आवाज आहे. 18 चाकी ट्रक वेगाने जात असताना रस्त्यावरून खाली उतरावा असा आवाज असल्याचे तो म्हणाला. 

बातम्या आणखी आहेत...