आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

CHILD BRIDE: स्वतःच्या मुलीचेच वय 18 अन् 11 वर्षीय चिमुकलीशी केला तिसरा निकाह, अख्खा देश संतप्त

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्वालालंपूर - मलेशियात 41 वर्षीय अब्दुल करीमने अवघ्या 11 वर्षांच्या मुलीशी तिसरा विवाह केल्याने देशभर संताप व्यक्त केला जात आहे. लहान मुलीसोबत करीमचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. लोक हा फोटो जास्तीत-जास्त शेअर करून आपला रोष व्यक्त करत आहेत. त्यातही वाइट म्हणजे, ज्या मुलीशी याने विवाह केला ती त्याची तिसरी पत्नी बनली आहे. सोबतच 6 लेकरांचा बाप असलेल्या करीमच्या सर्वात मोठ्या मुलीचे वय 18 वर्षे आहे. अशात अवघ्या 11 वर्षीय मुलीशी तो विवाह कसा करू शकतो यावर लोक संतप्त आहेत. 


करीम म्हणतो, लग्न केलेय, घेऊन पळालो नाही!
देशभर आपल्या नावे संताप व्यक्त केला जात असल्याची जाणीव करीमला झाली. त्याने बॉर्नियो पोस्टशी बातचीत करताना आपल्या कृत्यावर स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. तो म्हणाला, "मी तिला काही घेऊन पळालो नाही. तिने आपल्या मर्जीने माझ्याशी निकाह केला आहे. जेव्हापासून तिच्याशी तिसरा विवाह केला, तेव्हापासून मला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. लोक मला आरोपी मानत आहेत. यावर मी खूप नाराज आहे. सोबत ती 11 वर्षांची मुलगी असल्याचा दावा खोटा आहे. तिचे वय 16 वर्षे आहे." आपला दावा सिद्ध करण्याच्या प्रयत्नात त्याने मॅरेज सर्टिफिकेट सुद्धा दाखवले. 


मुलीच्या कुटुंबियांनीही दिले स्पष्टीकरण
तर दुसरीकडे मुलीच्या कुटुंबियांनी सुद्धा यावर स्पष्टीकरण दिले आहे. लग्नात एक अट ठेवण्यात आली आहे. जोपर्यंत ती 16 वर्षांची होत नाही तोपर्यंत ती आमच्या घरीच राहणार आहे. सोबतच, तो एक भंगार व्यापारी आहे. तसेच इतरांच्या तुलनेत अधिक श्रीमंत आहे. असेही तिच्या आई-वडिलांनी सांगितले. 


UNICEF कडूनही संताप
मलेशियात यूनिसेफचे प्रतिनिधी मरीन क्लार्क हॅटिंग यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. अशा प्रकारच्या घटना कदापी मंजूर केल्या जाऊ शकणार नाहीत. कुठल्याही बाबतीत हे लहान मुलांच्या हिताचे नाही. हे तर बाल हक्कांचे उल्लंघन आहे. अनेकांनी सोशल मीडियावर या मुलीच्या पालकांनी तिचे लहानपण हिरावल्याची टीका केली. 


सरकारकडे लग्नाचा रेकॉर्ड नाही
काहींनी मलेशिया सरकारला सुद्धा या प्रकरणात धारेवर धरले. परंतु, मलेशिया सरकारकडे या लग्नाचा रेकॉर्ड नाही. सरकारने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. असेही सांगितले जात आहे, की त्यांचा निकाह थायलंडमध्ये झाला. तसेच मुलगी सुद्धा थायलंडची आहे. मलेशिया सरकारने या प्रकरणाला गांभीर्याने घेतले आहे. त्यामुळे, धार्मिक परिषदेसोबत मिळून या प्रकरणाचा तपास केला जात आहे.

बातम्या आणखी आहेत...