आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वयाच्या 6 व्या वर्षीच बनला अब्जाधीश, वार्षिक कमाई तब्बल 70 कोटी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - युट्यूबवर फक्त व्हिडिओज पोस्ट करून 6 वर्षांचा चिमुकला देखील धनकुबेर होऊ शकते हे अमेरिकेच्या चिमुकल्याने सिद्ध केले आहे. 2014 मध्ये 4 वर्षांचा असताना रियानला युट्यूबचे व्हिडिओ पाहण्याची सवय होती. तो इंटरनेटवर खेळण्यांच्या समीक्षेचा फॅन होता. आज तो अब्जाधीश आहे. 

 

> 2014 मध्ये अमेरिकेच्या एका नर्सरीत शिकणाऱ्या रियानला युट्यूबवर व्हिडिओ पाहणे खूप आवडत होते. त्यातही इंटरनेटवर खेळण्यांचे रिव्ह्यू पाहणे त्याला पसंत होते. 
> त्यावेळी 4 वर्षांचा असताना हे व्हिडिओ युट्यूबवर नेमके टाकतात कसे असा प्रश्न त्याला पडत होता. रियानने आपल्या पलकांकडे याची चौकशी केली. आणि ती पद्धत खूपच सोपी वाटल्याने आपणही युट्यूबवर व्हिडिओ टाकू शकतो असे रियानने व्यक्त केले. 
> आई वडिलांनी आपल्या चिमुकल्याची इच्छा पूर्ण केली आणि 2014 मध्ये Ryan ToyReview असे युट्यूब चॅनल तयार करून दिले. या चॅनलला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. 2015 पर्यंत आपल्याला प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहूनही त्याची जिज्ञासा कमी झाली नाही. तो नेहमीच खेळण्यांचे बॉक्स उघडून लोकांना त्याची वैशिष्ट्ये सांगायचा.

 

असे पालटले नशीब
> रियानने 2015 मध्ये रियान 'जायंट एग सरप्राईझ' चा एक व्हिडिओ अपलोड केला. यात प्लास्टिकचे मोठे-मोठे अंड्याच्या आकाराचे बॉक्स उघडून तो अगदी खुश होत-होत फॅन्सला त्यातील सरप्राइझ गिफ्ट दाखवत होता. 
> त्याचा हाच व्हिडिओ इतका व्हायरल झाला की तो एक-दोन कोटी नव्हे, तर तब्बल 80 कोटी चाहत्यांनी पाहिला. पाहता-पाहता त्याच्या चॅनलच्या फॉलोअर्सची संख्या 1 कोटी पर्यंत गेली. 
> 2017 मध्ये त्याने युट्यूब व्हिडिओज अपलोड करून 11 मिलियन डॉलर्स अर्थात जवळपास 71 कोटी डॉलरची कमाई केली. त्याची ही कमाई अजुनही सुरूच आहे. त्याला खेळण्या खूप आवडतात. त्यातही त्याबद्दल माहिती देण्याची पद्धत लोकांना खूप आवडते. 
> फोर्ब्सने त्याला युट्यूबवरून 2017 मध्ये 8 वा सर्वात जास्त कमाई करणारा युट्यूबर घोषित केले आहे. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, त्याचे फोटोज आणि व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...