आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जबुडव्या माल्याची 600 कोटींची लक्झरी याट माल्टामध्ये जप्त, क्रू मेंबर्सला पगार न दिल्याने कारवाई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - विजय माल्याची 93 मिलियन डॉलर (तब्बल 603 कोटी रुपये) ची सुपरयाट (नौका) माल्टामध्ये जप्त करण्यात आली आहे. क्रू मेंबर्सना 1 मिलियन डॉलर ( 6.5 कोटी रुपये) एवढे वेतन न दिल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. माल्यावर भारतीय बँकांचे 9 हजार कोटींहून जास्त रकमेचे कर्ज आहे. तो मार्च 2016 मध्ये भारतातून पळून गेला होता. माल्या सध्या लंडनमध्येच राहत आहे. भारताने त्याला फरार घोषित केलेले आहे.


याटवर होते 40 क्रू मेंबर
- वृत्तसंस्था एएनआयच्या रिपोर्टनुसार, याटवर 40 हून अधिक क्रू मेंबर होते. यात अनेक भारतीय, ब्रिटिश तसेच पूर्व युरोपीय देशांचे लोक होते. या सर्वांना मागच्या सप्टेंबरपासून वेतन मिळालेले नाही.
- 95 मीटर लांब असलेली माल्याची ही याट इंडियन एम्प्रेस या नावाने ओळखली जाते. सध्या याटला माल्टा बंदर सोडण्यावर बंदी आणण्यात आली आहे.
- मेरीटाइम युनियन नॉटिलस इंटरनॅशनलचे स्ट्रॅटजिक ऑर्गनायझर डॅनी मॅकगोवन म्हणाले, "आमच्या सदस्यांनी जहाजाच्या मालकाला कर्मचाऱ्यांचे वेतन करण्यासाठी अनेक वेळा संधी दिली होती."
- "आम्ही याटसाठी इंश्योर्ड कंपनीच्या नियमांतर्गत 6 लाख 15 हजार डॉलर घेतले आहेत, परंतु अजूनही एक मोठी रक्कम वसूल करणे बाकी आहे."
- तथापि, माल्याकडून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही.

बातम्या आणखी आहेत...