आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

3 वर्षांच्या बालकाचा झोपेतच झाला मृत्यू, डॉक्टरांनी सांगितले Shocking आहे कारण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूज डेस्क - अमेरिकेतील रहिवासी शॉर्टलँड कुटुंबाची ही कहाणी प्रत्येक आईवडिलांना सावध करणारी आहे. 2016 मध्ये जॉश आणि जास्मिन शॉर्टलँड यांच्या 3 वर्षांच्या बाळाचा झोपेत असतानाच मृत्यू् झाला होता. परंतु एका आठवड्याने जेव्हा बाळाच्या मृत्यूचे कारण समोर आले, तेव्हा डॉक्टरांसोबतच पूर्ण कुटुंबाला धक्का बसला होता. 3 वर्षांच्या ब्रायन एंड्रयूला कांजण्या झाल्या होत्या. काही दिवसांनंतर ब्रायन रोजच्यासारखा खेळायला लागला होता. तथापि, आई जास्मिनने ब्रायन आणि त्याच्या मोठ्या भावाला आजीकडे पाठवले, ज्यामुळे तिच्या सर्वात लहान मुलाला इन्फेक्शन होऊ नये. जास्मिनला वाटले नव्हते की, ती आपल्या लाडक्याला शेवटचे पाहत आहे. 

 

आजीने उठवले, पण उठला नाही ब्रायन...
- एका सकाळी जेव्हा लहानग्या ब्रायनला उठवण्यासाठी आजी जवळ गेली, तेव्हा तो उठला नाही. खूप प्रयत्न करूनही तो उठला नाही, तेव्हा आजीने इमर्जन्सी सर्व्हिसला कॉल केला. परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टर म्हणाले की, ब्रायनचा झोपेतच मृत्यू झाला होता. या घटनेनंतर ब्रायनच्या कुटुंबीयांना धक्का बसलेला होता. त्यांना कळले नाही की, कालपर्यंत हसताना-खेळताना दिसत होता. मग अचानक झोपेत त्याला काय झाले? ब्रायनची आई म्हणाली, मला शेवटचे आठवते, तो हसत माझ्याजवळ आला आणि आय लव्ह यू मॉम म्हटला होता.

 

पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये झाला हा खुलासा
- चिमुरड्याच्या अचानक मृत्यूमुळे शॉर्टलेंड कुटुंबाला मोठा धक्का बसला होता. डॉक्टरांनी सांगितले की, ज्या चिकन पॉक्सला मामूली समजत होते, त्यानेच या बाळाचा जीव घेतला. रिपोर्टमध्ये आले की, बाळाच्या शरीरात Staphylococcus नावाचा बॅक्टेरिया पसरला होता, ज्यामुळे ब्लड पॉयजनिंग (sepsis) झाली होती. हे चिकन पॉक्समुळे झाले होते. चिकन पॉक्समुळे मुलाच्या शरीरावर व्रण झाले होते. ते खाजवूनही भरले नाहीत आणि बॅक्टेरिया रक्तात मिसळला. मुलाच्या मृत्यूनंतर त्याची आई जास्मिनने ठरवले की, ती या आजाराविषयी जागरूकता निर्माण करीन. तिने ब्लॉगच्या माध्यमातून आपली कहाणी लोकांना शेअर केली, ज्यामुळे तिच्यासारखे दु:ख इतर आईवडिलांना सहन करावे लागू नये.

 

डॉक्टरांचा सल्ला
- छोट्या मुलांना जर कांजण्या झाल्या, तर त्यांच्याकडे विशेष लक्ष ठेवले पाहिजे. त्यांना फोड खाजवण्यापासून रोखले पाहिजे. असे केल्याने जीवघेणे इन्फेक्शनही होऊ शकते.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित Video व Photos...

 

बातम्या आणखी आहेत...