आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Inspiring: आईला अडचण होती, मग वडिलांनीच केले बाळाला स्तनपान; रातोरात बनले सोशल मीडियावर स्टार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्हिस्कोन्सिन (अमेरिका) - अमेरिकेतील एका वडिलांनी आपल्या बाळाला स्तनपान केल्याचा व्हिडिओ सोशलवर व्हायरल होत आहे. विस्कोन्सिनमध्ये मॅक्समिलन आणि एप्रिल न्यूब्यूर यांना जूनमध्ये कन्यारत्न झाले. आईला आपल्या नवजात मुलीला दूध पाजण्यात आजारपणामुळे अडचणी येत होत्या. यामुळे तिचा पती मॅक्समिलन याने सप्लिमेंटल नर्सिंग मेथडच्या माध्यमातून बाळाला दूध पाजले. दांपत्याने मुलीचे नाव रोसालिया ठेवले आहे. डॉक्टर म्हणाले की, एप्रिलने इमर्जन्सी सी-सेक्शनमध्ये मुलीला जन्म दिला होता. सुरुवातीला ती हॉर्मोनल डिसऑर्डरमुळे बाळाला जन्म देऊ शकणार नसल्याचे वाटले होते. याला पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिन्ड्रोम म्हणतात. मुलीच्या जन्मादरम्यान एप्रिलवर सीजर करण्यात आले.

 

कॉम्प्लिकेशन वाढल्याने पाजू शकली नाही दूध...
- मॅक्सने मुलीला स्तनपान करण्याचा खुलासाही केला. ते म्हणाले की, 'पत्नीच्या कॉम्प्लिकेशनमुळे मुलीला ती लगेच दूध पाजू शकत नव्हती. मग नर्सने सांगितले की, नवजात बाळाला फिजिकल टच अत्यंत गरजेचा असतो. मग तिने वडिलांना स्तनपान करण्यासाठी सांगितले.
- ब्रेस्टफीडिंग डोर काउंटी मेडिकल सेंटरच्या नर्सने मॅक्सला 'सप्लीमेंटल नर्सिंग मेथड'च्या माध्यमातून ब्रेस्टफीडिंग करण्याची पद्धत सांगितली. मॅक्सने स्वत: याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले, यानंतर ते व्हायरल झाले.

 

काय आहे पॉलिसिस्टक ओव्हेरियन सिंड्रोम
- पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिन्ड्रोम (पीसीओएस) एक असा आजार आहे, ज्याने मागच्या 10 वर्षांत महिला सर्वात जास्त प्रभावित झाल्या आहेत. हॉर्मोन डिसबॅलन्स झाल्याने होणाऱ्या आजारामुळे महिलांना अनेक गंभीर त्रास होतात. यापैकीच एक आहे वंध्यत्व.
- स्त्रियांच्या ओव्हरीमध्ये साधारणपणे कोणतीही सिस्ट नसते. दर महिन्याला ओव्हरी एग रिलीज करतात, ज्याला सर्वसाधारण भाषेत पीरियड्स म्हटले जाते. जेव्हा एखाद्या फीमेलच्या शरीरात मेल हॉर्मोन आणि फीमेल हॉर्मोनचे संतुलन बिघडते, तेव्हा शरीरात वाढलेले मेल हॉर्मोन अँड्रोजन ओव्हरीतील एग्ज सप्रेस करून त्यांना छोट्या-छोट्या सिस्ट किंवा गाठींमध्ये बदलतात. यामुळे ओव्यूलेशनची प्रक्रिया बिघडते. एग रिलीज होत नाही, ज्यामुळे पीरियड्समध्ये अनियमितता येते. अनेकदा तर पीरियड्स येणेच बंद होऊन जाते. यामुळे पुढे चालून महिलांना वंध्यत्वाचा सामना करावा लागू शकतो.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, हा Viral Video व आणखी Photos... 

 

 

बातम्या आणखी आहेत...